Uncategorized

न.प.च्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

हनुमान वार्डात भाड्याच्या खोलीत राहत होता तरूण 

पुसद: शहरातील हनुमान वार्डात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.तो खोलीत एकटा असताना दि.१७ मार्च ते १८ मार्च २०२४ रोजीच्या रात्री आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे.पवन कैलास घड्याळे वय २४ वर्षे रा.हनुमान वार्ड असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे.त्याने भाड्याच्या घरांतील लोखंडी कडीला लांब रूमालाच्या सहाय्याने आत्महत्या करून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पवन हा नगरपालिकेच्या आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून काम करीत होता.घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्याला कळताच तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले.घटनेच्या ठिकाणाचा पंचनामा करून पवन चे शव येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आले आहे.आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close