छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीची नियोजन सभा संपन्न;डीजे विरहित शोभायात्रेचा संकल्प

पुसद :शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीने १९फेब्रुवारी २०२४रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४व्या जयंती निमित्त नियोजन सभा संपन्न झाली.पुसद अर्बन बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या बैठकीच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.त्यानंतर पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी प्रस्ताविकातून यंदाच्या शिवराय जन्मोतसव आयोजनाची माहिती देतांना भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थे द्वारा प्रायोजित शिवसामान्य ज्ञान स्पर्धा ४फेब्रुवारी रोजी ,१६ते १८फेब्रुवारी तीन दिवस महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांच्या विचारांची मेजवानी देण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. १८फेब्रुवारी चे, रात्री १२:००वाजता शिव जन्म साजरा केल्या जाणार असून सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवपुजन, मोटर सायकल रॅली व दुपारी २:००वाजता पासून शहराच्या मुख्य मार्गाने भव्य शोभयात्रा राहणार आहे. प्रत्येक वार्डात शिवजयंती साजरी व्हावी असे देखील त्यांनी आवाहन केले. शिव जन्मोत्सव सोहळा आकर्षक व अधिक भव्य करण्याचे हेतूने भारत अण्णा पेन्शनवार, बाबाराव उबाळे, वैभव फुके,प्रा संजय चव्हाण, नितीन पवार, सैय्यद इशत्याक,विनोद जिल्हेवार,मिलिंद हट्टेकर, शेख कय्युम,करण पानपट्टे यांनी सुचना मांडल्या .अजय क्षीरसागर यांनी छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती व वंदे मातरम ग्रुप तर्फे स्वराज्य चॅलेंज ही सायकलिंग व चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. सभेचे संचलन चंद्रकांत ठेंगे यांनी तर ॲड. माधवराव माने यांनी भव्य दिव्य शिवजयंती साजरी होईलच असा विश्वास दर्शवून आभार व्यक्त केले. सभेला प्रा. सुरेश गोफने,एड आशिष देशमुख, सुधीर देशमुख, दिगंबर जगताप,सदबाराव मोहटे, राजन मुखरे,डॉ.पंकज जैस्वाल, परमेश्वर जैस्वाल, शरद पाटील, सुरज डुबेवार,एड. उमाकांत पापिनवार,मोहन विश्वकर्मा,राजू साळुंके, निखिल चिद्धरवार, पंजाबराव खडकेकर, पंजाबराव भोयर, सिराज(पिंटू) हिरानी, संदीप जिल्हेवार,साहेब राव ठेंगे,यशवंतराव, चौधरी,दीपक जाधव,दीपक अवचार विलास कोरडे, रणजीत सांबरे,ललित चव्हाण, के जी चव्हाण, व्ही एन वानखेड़े, गणेश डंगोरिया, किरण देशमुख,वैष्णव ढोकने, रेनुदेव डुबेवार, रमेश डुबेवार, ॲड. आदित्य माने, ॲड.गजानन देशमुख, बंडू खराटे सर, ॲड.मनोज घाडगे, ॲड. भारत जाधव, उदय गंधेवार, सुशांत महल्ले,प्रभाकर टेटर, सत्यजीत देशमुख, उमेश इंगळे आदी असंख्य शिवभक्त उपस्थित होते.
,



