पुसद येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर मार्गदर्शन शिबीर संपन्न!

पुसद: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पुसद द्वारा आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर मार्गदर्शन शिबीर, डहाणूकर सभागृह पी. एन.कॉलेज पुसद जि.यवतमाळ येथे दिनांक २५ मे २०२३ रोजी संपन्न झाले .या शिबिरात दहावी बारावी व इतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी बाबत मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये दहावी बारावी नंतरचे अभासक्रम ,आय .टी.आय प्रवेश प्रक्रिया, उद्योजकीय दृष्टिकोन, कर्ज योजना माहिती, ,करिअर प्रदर्शनी इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर मार्गदर्शन शिबीराचे उद्घघाटक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ.मोहिनिताई इंद्रनील नाईक कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभव फुके यशस्वी उद्योजक तथा IMC सदस्य उपस्थित होते .प्रमुख अतिथी व तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ.प्रशांत वासनिक सहयोगी अधिष्ठाता डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेज पुसद उल्हास चव्हाण कार्यकारी प्राचार्य पी.एन.कॉलेज पुसद,उमेश चव्हाण प्रबंधक पी. एन.कॉलेज पुसद,डी.पी.पवार प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखे नितेश सहारे प्रबंधक युनियन बँक पुसद, जयसिंग राठोड माजी प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड ,रमेश सरागे माजी शिल्प निदेशक (आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त ) उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हि.डी.राठोड प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुसद यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम.कापशीकर शिल्प निदेशक यांनी केले व आभार प्रदर्शन एम.एम.देशमुख शिल्प निदेशक यांनी केले, करिअर प्रदर्शनी व नोदणी करिता व्हि.आर.काकणे शिल्प निदेशक यांनी परिश्रम घेतले.शिबिरा करिता पी. एन.कॉलेज पुसद यांचे सहकार्य लाभले .कार्यक्रमाच्या यशस्विते करिता एस.टी.रामटेके ,एस.डब्लू.खुटाफळे,एन.पी.कावळे , ए.एन वानखडे,पी.एम. गोंडे, सौ.व्हि.आर.सरागे ,कु.व्हि.डी.जाधव,कु. एस.आर. हट्टेकर सौ.एम.ओ. गवई,पी.डी. नरसिंग, व्ही.एम.गोलाइतकर, आर.व्हि.गावंडे,के.आर.सुनार ,यु.पी.पवार ,सौ. डी. ए .चौधरी, सौ.वाकडे,बी.जि .राठोड, पडघने,सौ.आर.एम. अर्धापुरकर इत्यादी कर्मचारी आय.टी.आय.पुसद व आय. टी.आय.हर्षी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले .