श्री गुरुदेव सेवा मंडळ काळी (दौ.) च्या वतीने एक साथ एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम संपन्न!

काळी दौ.प्रतिनिधी ( संदीप ढगे) स्वच्छता पंधरवडा उपक्रमांतर्गत१ ऑक्टोबर २०२३ रोजी एक साथ एक तास श्रमदान मोहीम श्री गुरुदेव सेवा मंडळ काळी ( दौ.) च्या वतीने गावात मोहीम राबविण्यात आली.
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्याला सत्तर वर्षा आधी ग्रामगीतेच्या माध्यमातून स्वच्छतेचे व श्रमदानाचे महत्त्व पटवून दिले ते म्हणतात काहींनी सांडपाणी साचविले, मच्छर जंतू अति वाढले, रोगराईंनी बेजार झाले, शेजारी सगळे, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता अवदशा , येईल देशा या उपक्रमामध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष परीक्षित मोरे उपाध्यक्ष शुभम ढगे सचिव सुरज काळसरे सहसचिव अनिकेत गडवे अविरतपणे मंडळाचे कार्य करणारे मार्गदर्शक साहेबराव गावंडे परमेश्वर आगोशे लक्ष्मण भोने
मंडळाचे सेवक सुदाम कळमकर पंडितकर प्रल्हाद कोरडे दिलीप वैद्य मनोहर गोभेकर नागेश झिंगरे प्रवीण बेले विठ्ठल मानतुटे दीपक मानतुटे संदीप ढगे संजय खरवडे सा. कार्यकर्ते श्रीनिवास मोरे ग्राप सदस्य निशाताई मोरे आदी महिला व गावकऱ्यांनी सहभाग घेतला तुकडोजी महाराजांच्या उक्ती प्रमाणे पवित्र ठेवावा देवाचा मार्ग याप्रमाणे गावातील विठ्ठल रुक्माई मंदिर सामकी माता मंदिर हनुमान मंदिर ग्रामपंचायत व बस स्टॉप परिसर मुंगसाजी मंदिर गावाच्या शेवटच्या टोकावर असलेले श्री संत फुलाजी बाबा ध्यान केंद्र इत्यादी परिसर मंडळाच्या वतीने स्वच्छ साफसफाई करण्यात आली.