संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची जयंती साजरी!

पुसद:डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड पुसद येथे दि. २४ फेब्रुवारी रोजी संत गुरू रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
“मन चंगा तो कटोती मे गंगा” या ओळीचे विख्याते श्री.संत रविदास महाराज ह्यांनी संपूर्ण जगाला मानवता, ऐक्य, बंधुभाव या मूल्यांनवर भर देवून मानवतेचा संदेश दिला.समाजात पसरलेल्या जाती द्वेषाच्या समूळ उच्चाटनासाठी त्यांनी शेवटपर्यंत काम केले.अशा महापुरुषाच्या जयंती दिनी त्यांच्या स्मृतीला उजाळा देवून त्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन पुसद येथील संत रविदास महाराज सेवा समिती तर्फे संत रविदास महाराज मंदिराच्या नियोजित जागेत,आंबेडकर वार्ड क्र.१३,पुसद येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संत रविदास महाराज यांच्या मूर्तीचे व प्रतिमेचे पुष्प हार अर्पण करून सर्व समाज बांधवांनी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६४७ व्या जयंती साजरी करण्यात आली.यावेळी अन्नदान चे वाटप करण्यात आले.ही जयंती चर्मकार समाजा तर्फे करण्यात आली. या जयंती कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता कैलास पनवेलकर, भारत कोरडे, सचिन सूर्यवंशी, नितीन गायकवाड, हितेश कांबळे, निलेश चापके, रोहित पनवेलकर, गोलू चापके,आकाश बोधने,मनोज चौधरी,संकेत डोईफोडे,शक्ती साठे,सुनील भालेकर, सोनी पनवेलकर इत्यादींनी सहभाग घेतला. तसेच जयंती कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये पुसद येथील पुढील सर्व डॉ.शशीप्रकाश चापके,कैलास मुकेश, अशोकराव गायकवाड ,रितेश चापके,विकास कोरटकर,सुरेश कुरील,संतोष मुकेश, आकाश चापके,राहुल कुरील,राम कोरडे व महिलांमध्ये सौ.शुभा चापके,श्रीमती.रंजना कोरडे,सौ.शुभांगी पिंजरकर, सौ.जया चापके, सौ.लक्ष्मी गायकवाड, सौ.छाया कोरडे, सौ.रचना कोरडे,अनु जोगदंडे, सौ कविता वाघमारे, सौ.संगीता पनवेलकर,गुड्डी जोगदंडे इत्यादी चर्मकार बांधव व भगिनी उपस्थिती होत्या.