ईतर

पुसद औषधी विक्रेता संघाच्या वतीने जागतिक फॉर्मासिस्ट दिना निमित्त वृक्षारोपण करून व एच.आय.व्ही. दिव्यांगाना एक वर्ष पुरेल एवढा किराणा कीटचा वाटप!

पुसदः औषधी विक्रेता संघाच्या वतीने जागतिक फॉर्मासिस्ट दिना निमित्त औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष रविंद्रजी पदमवार व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत व्यापारी भवन येथे दि. २५ सप्टेंबर २०२५ रोज गुरुवारला पंचवटी वृक्षाचे वृक्षारोपण व फुलांच्या झाडांचे वृक्षारोपणसह एच.आय.व्ही. दिव्यांग मुला-मुलींना एक वर्ष पुरेल एवढा किराणा कीटचे वाटप करण्यात आला तसेच नविन केमीस्ट बांधवांना एप्रॉनचे वाटप सुध्दा करून जागतिक फॉर्मासिस्ट दिना साजरा करण्यात आला.

याबाबत प्राप्त माहिती अशी की,पुसद औषधी विक्रेता संघाच्या वतीने आज जागतिक फॉर्मासिस्ट दिना निमित्त औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष रविंद्रजी पदमवार व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तसेच जीवन ज्योती एड्स प्रतिबंध व प्रबोधन संस्था पुसद व रेणुका राष्ट्रीय दिव्यांग संस्था पुसद या दोन्ही संस्थांना एक वर्षभर पुरेल एवढा अन्नधान्य किराणा किटचे वाटप करून व्यापारी भवन येथे पंचवटी वृक्षाचे वृक्षारोपण व फुलांच्या झाडांचे वृक्षारोपणसह ‍एच.आय.व्ही.तसेच नविन केमीस्ट बांधवांना एप्रॉनचे सुध्दा वाटप करण्यात आला हा उपक्रम औषधी विक्रेता संघटनेच्या प्रत्येक केमीस्ट बांधवांच्या आर्थिक सहकार्यातुन हा राबविण्यात आला.त्याचप्रमाणे २०२४-२०२५ या वर्षामध्ये ज्या केमीस्ट बांधवांनी मेडीकल दुकान चालू केले आहे.

त्या केमीस्ट बांधवांना एप्रोनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्रजी पदमवार औषधी विक्रेता संघ पुसद, कार्याध्यक्ष संतोषजी तडकसे, गजाननजी गादेवार सचिव सुशांतजी महल्ले, कोषाध्यक्ष वर्धमानजी भागवत, संघटन सचिव नितीनजी त्रंकटवार, जेष्ठ मार्गदर्शक कोंडबाराव पाटील यांची प्रमुखउपस्थिती मंचावर होती.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रविंद्रजी पदमवार यांनी केले. त्यांनी सर्व केमीस्ट बांधवांना अतिशय मुद्देसुद मार्गदर्शन केले व फॉर्मसी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुशांतजी महल्ले यांनी केले व आभार प्रदर्शन संतोषजी तडकसे यांनी केले. या कार्यक्रमास रविंद्र पदमवार, संतोष तडकसे, गजानन गादेवार, सुशांत महल्ले, वर्धमान भागवत, नितीन वंकटवार, राहूल डुब्बेवार, भुषण चिद्दरवार, भुषण कुबडे, रितेश सरगर, विवेक सावदे, व्यंकटेश आसेगांवकर, समीर शेख, संदिप मुक्कावार, धनंजय तडकसे, ऋषीकेश पंडीतकर, महेश तगलपल्लेवार, संजोग तगलपल्लेवार, आनंद बेलगमवार, गजानन मॅडमवार, रमाकांत चिंतावार, समीर ओमनवार या कार्यक्रमास सर्व केमीस्ट बांधवांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close