कांस्यपदक विजेत्या कन्येचे गावकर्यांसह विविध सामाजिक संघटनांनी केले स्वागत!
खेलो इंडिया खेलो राष्ट्रीय स्पर्धेत पूजा ठेपेकरने पदक पटकावून रोवला मानाचा तुरा

पुसद : येथील कन्या व गुणवंतराव देशमुख विद्यालयातील विद्यार्थीनीने खेलो इंडिया युथ गेम्समधील वेटलिफ्टींगमध्ये कांस्यपदक पटकावल्यानंतर गावात सोमवारी (ता.१९) आगमन होताच गावकर्यांसह विविध सामाजिक संघटनांनी तिचे स्वागत करुन पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. येथील स्वामी विवेकानंद काॅलणीतील रहिवासी व गुणवंतराव देशमुख माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयाची वर्ग दहावीची विद्यार्थिनी कु. पूजा संजय ठेपेकर हिने पटना(बिहार)येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय खेलो,इंडिया खेलो मधील वेटलिफ्टींग स्पर्धेत ४९ किलो वजन गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन कांस्यपदक पटकावले व श्रीरामपूरसह यवतमाळ जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.पदक पटकावून श्रीरामपूर नगरीत ओपन कारमधून पूजाचे आगमन होताच मराठा सेवा संघ,संवेदना सोशल फाऊंडेशन,आर्यवैश्य समाज या सामाजिक संघटनांसह गावकर्यांनी एकच जल्लोष करून तिचे हार,तूरे,शाल,श्रीफळ देऊन भव्य स्वागत केले.मराठा सेवा संघातर्फे जिजाऊ प्रतिमा देत मिठाई भरवून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.यापूर्वी तिने राष्ट्रीय पातळीवर चौथा क्रमांक पटकावून खेलो इंडियामध्ये प्रवेश मिळवला व त्यात घवघवीत यश संपादन करुन कांस्यपदक पटकावले विशेष म्हणजे नुकत्याच लागलेल्या इ.१० वी च्या निकालातही तिने ९०% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल येथील नवचंडिका सभागृहात तिचा सत्कार केला. गुणवंतराव देशमुख विद्यालय हे ग्रामीण भागात असतांना देखील विद्यालयाने पूजा ठेपेकर पूर्वीही फैजान खान,अनल राठोड,शिल्पा चव्हाण,सुनिता रसाळ,अनिता खडसे,महिमा राठोड आदी खेळाडूंना राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचविल्याबद्दल मान्यवरांनी संस्थेचे संचालक मंडळ, कोषाध्यक्ष अॅड आशिष देशमुख,मुख्याध्यापक,सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी पूजा ठेपेकरचे पालक,नातेवाईक,चाहते, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष हरगोविंद कदम,आर्य वैश्य समाजाचे राजेश आसेगांवकर,संवेदना सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण देशमुख सवनेकर,सचिव शशिकांत जामगडे,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक यशवंत देशमुख,ज्येष्ठ नागरिक श्री. भोरे, गुणवंत आसेगांवकर, बालाजी बंडेवार, एकनाथ पुलाते,दिनकर ठेंगे, मोहन बोजेवार, गिरीधर ठेंगे, स्वप्नील देशमुख, स्वप्नील येरावार,राजाभाऊ देशमुख, श्रीकांत बनसोड,कोंडबाराव देशमुख, श्री.काजळे, गुणवंतराव देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय खैरे,पूजाला मार्गदर्शन करणारे शारिरीक शिक्षक अविनाश कराळे ,वेटलिफ्टींगचे कोच रोशन देशमुख, अशोक पोले, नितीन दाभाडकर,संजय राजूरकर, संजय कडू,श्री. माहूरे, मराठा सेवा संघ,संवेदना सोशल फाऊंडेशन व आर्यवैश समाजचे पदाधिकारी व श्रीरामपूरातील प्रतिष्ठीत नागरिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.