संतप्त नागरिकाकडून ढाणकी शहर कडकडीत बंद! खाजगी शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; गर्भपाताच्या ओव्हरडोजमुळे रुग्णालयात मृत्यू!
त्या ढाणकी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाचे पुसद कनेक्शन!

पुसद : उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील घृणास्पद घटना शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या पवित्र नात्याल काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे एका खासगी शिक्षकाने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा गर्भपाताच्या ओव्हरडोजमुळे नांदेड येथील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. परंतु सदर घटनेचे धागेदोरे पुसद येथील खाजगी रुग्णालयाशी जोडले गेले असल्याने पुसद शहरात गर्भपाताच्या रुग्णावर उपचार होत असल्याचे स्पष्ट झाल्याने पुसद शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. परंतु सदर प्रकरणाचा तपास पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलिस सहनिरीक्षक प्रेम केदार यांचे पथक तपास करीत आहेत.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिली अशी की,ही घटना उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील गावात घडली असून, मराठवाड्यातील सरसम येथील रहिवाशी असलेला आरोपी शिक्षक खासगी शिकवणी घेत होता. पीडित मुलगी त्याच्याकडे शिकायला जात होती. मात्र, शिक्षकाने आपल्या पदाचा गैरवापर करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व त्या विद्यार्थिनीला आमिष दाखवून शिकविण्याच्या बहाण्याने तो तिला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करत होता. यातून ती चार महिन्यांची गर्भवती राहिली. बदनामीच्या भीतीपोटी त्याने त्या विद्यार्थिनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. अधिक गोळ्या खाल्ल्याने मुलीची प्रकृती बिघडली.त्यावेळी त्या मुलीला उपचारासाठी पुसदच्या खासगी रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर हे अवैध गर्भपाताचे प्रकरण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती पुसद पोलिसांना दिल्यावर पोलिस सह निरीक्षक प्रेम केदार आपल्या पथकासह रुग्णालयात जाऊन त्या मुलीचा जबाब नोंदवून घेतला.
त्या अल्पवयीन मुलीचा रक्तस्त्राव जास्त सुरू झाल्याने पुन्हा त्या अल्पवयीन मुलीला दुसऱ्या खाजगी रुग्णालयांत दाखल केले त्यावेळी शहरातील नामांकित सुसज्ज रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्या मुलीला तेथूनही नांदेड येथे रेफर केले त्यावेळी त्या मुलीची प्रकृती जास्त बिघडल्याने पुन्हा तिला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. व शासकीय रुग्णालय तिचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरतात या घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष समस्त नागरिक पालक व्यापारी वर्ग यांच्याकडून ढाणकी शहर बंद करण्यात आले. व शिक्षिकेपेक्षाला काळी माफ असणाऱ्या शिक्षकाला कठोरात कठोर कारवाई करून फाशी द्या अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी पुसद शहर पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक यांनी घेतलेल्या पिढीतेच्या जबाब वरून पिढीत अल्पवयीन न मुलीशी जवळीक साधून क्लासरूम मध्ये तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवून तिला गर्भवती केल्याने आरोपी विरोधात बिटरगाव पोलीस स्टेशन येथे २०११/ २०२५ कलम ६४ (२) (एफ) (आय) (एम) भारतीय न्यायसंहिता सहकलम ४, ६ पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.
व नागरिकांचा रोज वाढल्यामुळे आरोपी संदेश गुंडेकर वय २७ वर्षे याला भोकर येथून अटक करण्यात आली. त्यावेळी घृणास्पद घटनेत बळी पडलेल्या अल्पवयीन मुलीला सकाळी १०:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांच्या वतीने शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून मागणी करण्यात आली. व सायंकाळी ६:३०
वाजण्याच्या सुमारास कॅण्डल मार्च चे आयोजन करून गावातील सर्व नागरिक व महिला गावकऱ्यासह सामाजिक संघटना राजकीय संघटना यांनी उपस्थित राहून पीडित मुलीला व तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा असे आव्हान करण्यात आले या घटनेच्या निषेर्धात दिवसभर ढाणकी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. परंतु या घटनेमुळे सर्व यवतमाळ जिल्हा हळहळला पण पुसद शहरातील खाजगी रुग्णालयात आजही गर्भपातासारख्या घटनेला बेककायदेशीरपणे उपचार होत असल्याच्या घटना निदर्शनास असल्याने पुन्हा गर्भपाताचा मुद्दा ऐरणीवर आला आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने या बेकायदेशीर उपचार देणाऱ्या रुग्णालयावर अंकुश लावून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे पुसद शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.