भाजपाचा नमुना ड’साठी आंदोलन; नगर परिषदेवर धडकला जनआक्रोश मोर्चा!

पुसद:शहरातील नगरपरिषद हद्दीतील शासकीय जागेवर वर्षांनुवर्षे रहिवाशी असलेल्या नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळावा व जागांची मोजणी करून नमुना “ड” देण्यात यावा जेणेकरून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ घेता येईल गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या या विषयासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष दीपक परीहार यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश न आल्याने अखेर दि.१२ जानेवारी रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास शेकडोच्या संख्येने जन आक्रोश मोर्चाचं आंदोलन छेडण्यात आले असून पुसद नप कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चाच्यावतीने नमुना” ड “सह विविध मागण्यांची मागणी करण्यात आली. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला अबालवृद्ध तथा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ भाजप नेते विनोद जिल्हेवार, आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपा शहराध्यक्ष दीपक परिहार, देविदास डोळस, राजेंद्र जगताप हेमंत अंभोरे आकाश ठोंबरे, संजय गजभिये, रमेश सोमाणी, वैशाली परिहार, विजया वाघमारे ,डॉ. रूपाली जयस्वाल, दिपाली जाधव, संतोष मुकेश, संतोष आर्य, ललित चव्हाण, सौ मंगला डोळस, इंदुबाई कांबळे, सौ रंजना शेळके, महेश काळे, जिजाबाई कांबळे, सौ शितल उतळे, श्रीमती गुजाबाई महाडिक, सौ अर्चना जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने गोरगरीब वंचित लाभार्थी उपस्थित होते.
शासकीय जागेवरील अतिक्रमित नागरिकांच्या घरांची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून युद्ध पातळीवर करून घेण्यात येत आहे सध्या नवीन पुसद व आंबेडकर वार्ड या ठिकाणी मोजणी सुरू असून उर्वरित पाच पॉकेट मधील जागांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाला ले-आऊट करिता प्रस्ताव पाठविण्यात येईल तर जून मध्ये मी आल्यानंतर जुलैमध्ये भुमी अभिलेख उपाधीक्षक कार्यालयाकडे मोजणी फी तब्बल ११ लाख रुपये भरली असून काम युद्ध पातळीवर सुरू आहे. एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची मी ग्वाही देतो असे मोर्चाला सामोरे जात नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत वायकोस यांनी सांगितले.”.



