क्राइम

खबरदार!’नायलॉन मांजा’ विक्री व वापरांवर पोलिसांची करडी नजर;सापडला तर कारवाई होणार!

नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह मुलांची चूक पालकांना भोवणार!

पुसद: शहरात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून येते. मात्र, पतंग कापण्याच्या स्पर्धेत जिंकण्याच्या हव्यासापोटी काही हौशी बंदी असलेला नायलॉन (चिनी) मांजाचा सर्रासपणे विक्री व वापर करीत आहेत. मात्र तो मांजा नागरिक, प्राणी आणि विशेषतः पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. शासनाने नायलॉन मांजावर कडक बंदी घातलेली असतानाही शहरातील अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने या मांजराची विक्री व वापर राजरोसपणे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव ‘झेप न्यूज’ ला सुत्रांनी सांगितले आहे.पंरतु या पार्श्वभूमीवर सुध्दा पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेत नायलॉन मांजा खरेदी, विक्री व वापरावर पूर्णतः बंदी लागू केली आहे.उल्लंघन करून साठा करणाऱ्यांवर २,५०,०००/-हजार तर वापरकर्त्यावर २५०००/-हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होणार आहे. त्यामुळे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी पुसद यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री आणि वापर होतो. याला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. मांजाच्या वापरामुळे होणार्‍या जीवितहानी पासून नागरिक, पक्षी आणि प्राणी यांचे संरक्षण करण्यासाठी नागरीकांना पोलीसांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नायलॉन मांजा अथवा चायनीज मांजा अत्यंत धारदार व धोकादायक असल्यामुळे त्याचा वापर केल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यतानिर्माण होते. मागील काही वर्षांमध्ये या मांजामुळे अनेक पक्ष्यांचे मृत्यू, नागरिकांचे गळे व इतर शारीरिक अवयव चिरले जाणे, दुचाकीस्वारांचे अपघात, विद्युत वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याच्या घटना घडतात. त्यामुळेच उच्च न्यायालयाने सुद्धा नायलॉन मांजाचा वापर, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे.

बाजारात ठिकठिकाणी पतंग, मांजांची दुकानं थाटली आहे. या पार्श्वभूमीवर चायनीज मांजा, नायलॉन मांजा, काचेचा चूऱ्याचे कोटिंग असलेला मांज्याची विक्रीवर पोलीस सहाय्यक अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बि.जे.यांनी बंदीचे आदेश दिले असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

१) वैयक्तीक व्यक्ती / पतंग उडविणारे कोणीही व्यक्ती नायलॉन मांजासह पतंग उडवतांना आढळल्यास त्या व्यक्ती विरूध्द रू. २५,०००/- (अक्षरी रूपये पंचविस हजार फक्त) दंड आकारण्यात येईल२) जर व्यक्ती ‘अज्ञान’ (Minor) असेल, तर सदर दंडाची रक्कम त्या मुलाच्या/मुलीच्या पालकांकडुन वसूल केली जाईल.३) विक्रेते (Vendors) कोणत्याही विक्रेत्याकडे नायलॉन मांजाचा साठा आढळल्यास किंवा विकी करतांना आढळल्यास त्यास २,५०,०००/- (अक्षरी रूपये दोन लक्ष पन्नास हजार फक्त) दंड आकारण्यात येईल ४) सदर दंड हा प्रत्येक वेगवेगळया गुन्हयांसाठी (For each default) वेगवेगळा लागू असेल .५) सदर दंडाची रक्कम जागेवर भरता न आल्यास, संबंधित अधिकाऱ्यां मार्फत मेमो दिला जाईल आणि १५ दिवसांच्या आत रक्कम न भरल्यास, ती रक्कम ‘महसूल थकबाकी ‘(Land Revenue) म्हणून कायदेशीर प्रक्रियेद्वारे वसूल केली जाईल.६) सदर जाहिर सुचनेची माहिती नव्हती किंवा अज्ञान होते, ही बाब दंड टाळण्यासाठी ग्राहय धरली जाणार नाही ७) अवैधरित्या मांजा वापर, विक्री बाबतची माहिती हेल्पलाईन क्रमांक ११२ या क्रमांकावर किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद येथे द्यावी माहिती देणाऱ्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने केले असून माहिती देण्याऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.कुणीही नागरीक नायलॉन मांजाचा वापर करतांना आढळून आल्यास त्यांचेविरूध्द पोलीस विभागाकडुन कडक कायदेशीर कारवाई केली जाईल करीता याद्वारे कळविण्यात येत आहे.पंरतु नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close