स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचं ठरलं, महायुतीचं अजून ठरेना! पुसद नगर परिषदेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार!

पुसद : गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त सापडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा मंगळवारी करण्यात आली.नगरपरिषदेच्या नगरसेवक पदांसाठी आणि थेट नगरध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे घोषित सर्व नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केली.त्याच अनुषंगाने नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुसद शहरात स्थानिक पातळीवर काल रात्री महाविकास आघाडीतील घटक पक्षाची बैठक घेऊन या निवडणुकीला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना घेऊन सोमोर जाणार असून नगराध्यक्ष पदासह नगर परिषदेच्या सर्व म्हणजे १५प्रभागामध्ये उमेदवार उभे करणार असून महाविकास आघाडीचा झेंडा नगर परिषदेवर फडकविण्याचा निर्धार केला असल्याची सुत्रांची महीती आहे.परंतु नपची निवडणुक प्रक्रिया सुरू होताच सत्ताधारी महायुतीच्या सहकारी पक्षातील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.त्यामुळे महाविकास आघाडीचं ठरलं, महायुतीचं अजून ठरेना,अशी परिस्थिती शहरातील राजकीय पक्षाची झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागिल अनेक वर्षांपासून खोळंबल्या होत्या मात्र आता निवडणुकीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.पुसद शहरात महायुती आणि महाविकास आघाडी राजकीय पक्ष आहेत. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेची (शिवसेना) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दादा पक्षाची महायुती आहे. तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) आणि शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) यांची महाविकास आघाडी आणि पुसद विकास मंच स्थापन करण्यात आला आहे.परंतु नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे या नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठीची सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे.महायुतील घटक पक्षांमध्ये नगराध्यक्ष पदावरून ठीणगी पडण्याची जास्त शक्यता नाकारता येत नाही.कारण वर्षानुवर्षे वर्षं प्रस्थापितांची एकहाती सत्ता असल्याने ते नगराध्यक्ष पदाचा दावा सोडण्यास तयार नाहीत तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे मत आहे की विधानसभेला आम्ही तनमन धनाने मतदान केल्याने कींवा करून घेतल्याने महायुतीतील सहकारी पक्ष म्हणून नगरपरिषद व नगरध्यक्षपद भाजपला मीळावे वरच्या पातळीवर प्रस्थापितांनी राजकारण करावे व स्थानिक स्वराज्य संस्था भाजपाच्या हातात राहु द्याव्यात परंतु प्रस्थापीत सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना हे धोक्याची घंटा असल्याचे जाणवु लागले आहे. त्यामुळे आमदार मंत्री असताना सुद्धा आपल्या हातातुन नगर परिषद जाणे म्हणजे आपले व आपल्या पक्षाची राजकीय ताकद कमी होणे आणि वरच्या पातळीवर मंत्रीपदालाही भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नगर परिषद व नगरध्यक्ष पदावरील दावा सोडण्यास ते तयार नाहीत त्यामुळे महायुतीतीलच दोन पक्षांत रस्सीखेच सुरू झाली असल्याने महायुतीत तणाव वाढतांना दिसत आहे. मात्र दुसरीकडे निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी गुप्त बैठक आयोजित केली या बैठकीला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी विधान परिषद सदस्य आमदार डॉ.वजाहत मीर्झा, प्रदेश सरचिटणीस डॉ.मोहम्मद नदिम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शरद मैंद,शहध्यक्ष डॉ.अकिल मेमन, सय्यद ईस्त्याक भाई, शहराध्यक्ष जियाभाई शेख, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला समोर जाण्यासाठी महाविकास आघाडीतील स्थानिक पातळीवर सर्व सहकारी पक्षांना एकत्र घेऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहे.तसेच नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासह सर्वच प्रभागांमध्ये उमेदवार उभे करून महविकास आघाडीतील सर्व उमेदवार निवडून आणून पुसद नगरपरिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकिणार असल्याची सूत्राची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे ठरलं, महायुतीचं अजूनही ठरेना..



