ईतरराजकियराज्यसामाजिक

जरांगे पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ हिवरा संगम येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने साखळी उपोषण

राजकीय नेत्यांना गावबंदी !

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम) :- राज्य शासनाला आरक्षण देण्यासंदर्भात ४० दिवसांची सवलत दिल्यानंतर सुद्धा शासनाने आरक्षणाबाबत कोणत्याही निर्णय घेतला नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा बुधवार २५ ऑक्टोंबर पासून पुन्हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली.

मराठा आरक्षणाच्या मागणीची धगधगतो ज्वाला राज्यातील महानगरांपासून ग्रामीण भागात देखील पोहचली असल्याचे दिसून येत असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यात सुरु असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने दि. ३० ऑक्टोबर २०२३ पासून येथील छत्रपती संभाजी महाराज चौकातील स्मारकासमोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले.

त्याचे रीतसर निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ, तहसीलदार महागाव, ठाणेदार महागाव, यांना देण्यात आले. यावेळी पंजाबराव पाटील कदम, विनोद खोंडे, रणजीत पाटील, गुड्डू कदम, निलेश करमोडकर, अरविंद कदम, ऋषिकेश कदम ,महेश कामारकर, रोहित फाळके, उमेश भोयर, संदीप बुळे,नितीन कदम, अविनाश नरवाडे, दीपक कदम, विशाल कदम, शरद पाटील, विनोद कदम सोनु भयसे , वैभव आखरे, वैभव तेलगावकर, यांच्यासह खूप मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

त्याआधी सर्व राजकीय पुढारी, नेत्यांना गाव ‘प्रवेश बंद’ हा महत्त्वपूर्ण ठराव हिवरा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. मेघाताई शिरीष बोरुळकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत सर्वानुमते घेण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close