क्राइम

अग्निशस्त्रासह जिवंत काडतुसे बाळगणारा गजाआड; उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई!

पुसद : शहरात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन सुरू होते तर त्याच दिवशी न्यायलायाच्या परिसरातील डाव्या गेट समोरील स्व.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर बेकायदेशीररित्या एक युवक अग्निशस्त्र व जिवंत काडतु घेऊन फिरत असल्याची खबऱ्याकडून खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली असता त्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या अधिनस्त असलेल्या पथकांने  त्याठिकाणी जावुन सापळा लावला असता सदर युवकांची विचारपूस केली व त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यावेळी त्याच्याकडे १ अग्निशस्त्र गावठी कट्टा, पिस्तूल व २ जिवंत काडतुस मिळुन आले असता त्यावेळीआरोपीला अटक करण्यात आली. त्यांनी हे अग्निशस्त्र कुठून तसेच कशासाठी आणले याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाकडून सुरू आहे.

  याबाबत पोलीस सूत्रांनी झेप न्यूज ला दिलेली माहिती अशी की,दि.१४ एप्रिल२०२५ रोजी शहरात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन सुरू होते. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाला खबऱ्याकडून गोपीनिय माहिती मिळाली की पुसद न्यायालयाच्या परीसरातील स्व.अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर शेख सलीम शेख ईस्माईल, वय २१ वर्षे, रा. तुकाराम बापु वार्ड पुसद, ता. पुसद, जि. यवतमाळ हे अग्निशस्त्र गावठी कट्टा बाळगून फीरत आहे. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या अधिनस्त असलेल्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठून सापळा रचून त्या युवकास ताब्यात घेऊन विचारपूस करून झडती घेतली असता त्याच्याकडे पॅन्टमध्ये १ अग्निशस्त्र गावठी कट्टा काळया सिल्व्हर रंगाचा व २ जिवंत काडतूस (बुलेट) असे असलेली किंमत अंदाजे २७,०००/- रूपयाची जप्त करण्यात आली. सदर आरोपीकडे शस्त्र बाळगण्याची कोणतेही परवानगी नसल्याने सदर अवैद्य शस्त्र वाळणाऱ्या नामे शेख सलीम शेख ईस्माईल विरूध्द शहर पो.स्टे. पुसद येथे फिर्याद नोंद करून कलम ३/२५ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला गजाआड केले आहे.त्यांनी हे अग्निशस्त्र कुठून तसेच कशासाठी आणले याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाकडून सुरू आहे.सदर अवैध अग्निशस्त्र बाळणाऱ्या विरूध्द रेड कारवाई कुमार चिंता, मा.पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचे मार्गदर्शनानुसार पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या अधिनिस्त असलेल्या पथकातील पोलीस अंमलदार/पराग गिरनाळे, नरेश नरवाडे, पोहवा/अभिजीत सांगळे, उमेश राठोड यांनी केली आहे.

 

पुसद पोलीस उपविभागामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणीही इसम अवैधरीत्या अग्निशस्त्र बाळगत असल्यास नागरीकांनी निर्भयपणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पुसद येथे माहिती कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे नागरीकांना जाहिर आवाहन करण्यात येत आहे.

– हर्षवर्धन बी.जे.
सहा. पोलीस अधीक्षक तथा उप-विभागीय पोलीस अधिकारी,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close