खाद्यतेल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील काळी (दौ.) दि.४ सप्टेंबर२०२४ रोजी एका दुकानातून ३० लिटर खाद्यतेल चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दुकानरांनी ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून यासंदर्भात फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ०६७५/२४ कलम३०३-२ भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने या गुन्ह्याचा शोध लावण्याकरिता खबऱ्यांना सतर्क करून त्यांच्याकडून प्राप्त गोपनीय माहिती व्दारे ५ सप्टेंबर रोजी घटनेतील आरोपी प्रमोद दत्ता राठोड वय ३५ वर्ष रा. काळी ( दौ.) याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्या आरोपीने चोरीची कबुली दिली.व त्याला अटक करून पुढील कारवाई करिता पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीकडून चोरी गेलेला ३० लिटर खाद्यतेलांचा माल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात एपीआय गजानन गजभारे, पीएसआय शरद लोहकरे, हेड कॉन्स्टेबल तेजाब रणखांब, मोहम्मद ताज, सुनील पंडागळे, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड रवींद्र श्रीरामे यांनी केली.



