लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळील पुलांचे बांधकाम करण्यासाठी आ. इंद्रनील नाईकांना साकडं!
माजी नगरसेवक निशांत सतीश बयास यांचा पुढाकार

पुसद:शहरातील जुने पुसद ते विठाळा भिलवडीकडे जाणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळयाजवळील अतिशय जिर्ण झालेला पुस नदीवरील लहानग्या पुल अतिशय बिकटअवस्थेत असुन वाढत्या वाहतुकीचा विचार करता या पुलाची उंची वाढविणे हे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात झालेल्या पावसामुळे हा पुल पुर्णत: खरडुन गेला आहे. त्यामुळे यावरुन वाहन चालवितांना वाहन चालकांना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे या पुलावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच याच रस्त्यावर लोकमान्य टिळक यांचा पुर्णाकृती पुतळा आहे जुन्या शहरातून विठाळा भिलवडी मार्ग ये-जा करण्यासाठी ग्रामीण भागातून शाळामहाविद्यालयातील विद्यार्थ्यासोबतच आजुबाजुच्या ग्रामीण भागातील दुधवाले, भाजीवाले, शेतकऱ्यांना तसेच सामान्य नागरिकांना या पुलामुळे शहरात ये-जा करण्यासाठी सोपे होणार आहे.यामुळे येत्या काळात हा पुल शहराच्या वाहतुकीच्या कोंडीतुन सुटण्याकरीता मदतच करणार आहे.जुन्या पुसदकडे येणा-या वाहन चालक व नागरीक या पुलाचा वापर करतात त्यामुळे हा पुल जिर्ण अवस्थेमुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी अडथळा निर्माण करीत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन माजी नगरसेवक निशांत सतीश बयास यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आमदार ॲड.इंद्रनिल नाईक यांची दि.१४ जानेवारी २०२४रोजी निवेदन देण्यात आले आहे.पुसनदीवर हा पुल तात्काळ जमिनदोस्त करून नविन पुलाचे उंची वाढवून बांधकाम करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी जुन्या पुसद शहरातील शेकडो नागरिक निशांत बयास यांचेसोबत उपस्थित होते. या निवेदनावर अंदाजे ३००-३५० नागरिकांनी सह्या करुन या पुलाची पुननिर्मीतीची मागणी केली आहे. या निवदेनाचा आ.इंद्रनील नाईक यांनी गांभीर्याने विचार करुन लवकरात लवकर या पुलाचे पुननिर्माणाचे काम करण्यासंबंधी उपस्थितांना यावेळी आश्वासन दिले आहे.