ईतर

पुसद शहरात फटाका विक्रेत्यांकडून सुरक्षा नियम पायदळी, शहरवासीयांची सुरक्षा धोक्यात!

पुसद: शहरात दिवाळीनिमित्त शहरातील नगर परिषद क्षेत्राच्या हद्दीत मुख्य बाजारपेठेला लागुन शेषराव जिनिंग प्रेसिंग प्रांगणात तसेच कारला रोडवरील जिजामाता मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या प्रांगणात उभारण्यात आलेले फटाका विक्री स्टॉल नियमबाह्य पद्धतीने व अग्निशामक दलाच्या नियमावलीला डावलून उभारले असल्याचे चित्र सध्या शहरात पाहवयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दिवाळीनिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठेला लागुन शेषराव जिनिंग प्रेसिंग या प्रांगणात तसेच कारला रोडवरील जिजामाता मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या फटाक्याचे फटाका विक्री स्टॉल नियमबाह्य पद्धतीने व अग्निशामक दलाच्या नियमावलीला डावलून उभारले असल्याचे चित्र सध्या शहरात आहे. शहरामध्ये काही फटाका व्यावसायिकांनी फटाका विक्रीसाठी तात्पुरती परवानगी घेतली होती. तरी शहरभर हजारो व्यावसायिक फटाक्यांची विक्री करीत आहेत. त्यामुळे नियम पायदळी तुडविले जात असून, शहरवासीयांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

फटाका विक्री स्टॉलसाठी अग्निशामक दल व पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या जीविताच्या दृष्टिकोनातून नियमावलीला हे फटाका विक्रेते फाटा देत आहेत. मात्र अनेक स्टॉलधारक या नियमांना पायदळी तुडवत स्टॉल उभारतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. शहरातील काही मुख्य चौकात बाराही महिने वर्दळीच्या ठिकाणी फटाका स्टॉल उभारण्यात आले आहेत, तर निवासी भागात फटाक्यांची अवैधरीत्या साठवणूक, वाहतूक व विक्री केली जाते तर अनेकांनी किराणा दुकानातही फटाकांची राजरोसपणे विक्री सुरू केली आहे.

काही फटाका विक्रेते फटाके विक्रीसाठी अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि संबंधित पोलीस ठाण्याची परवानगी बंधनकारक असताना सुद्धा विक्रेत्यांनी तशी परवानगी घेतली नसल्याचे दिसून येते. अशा अनधिकृत दुकाने व बेकायदा विक्रीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नुकतीच हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीतील दाट रहिवासी वस्तीमध्ये फटाक्यांच्या अवैधरीत्या साठवणूक ठेलेल्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत जवळपास चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जख्मी झाले होते ही हृदयद्रावक घटना घडली होती तरीही संबंधित प्रशासन मात्र धृतराष्ट्राचे सोंग घेतले असून या शहरात स्फोटके नियम (Explosives Rules) आणि महाराष्ट्र सरकारच्या सुरक्षा मार्गदर्शक सूचनांनुसार, फटाक्यांच्या दोन तात्पुरत्या दुकानांमधील (स्टॉल्समधील) अंतर किमान ३ मीटर (सुमारे १० फूट) असणे बंधनकारक असताना सुद्धा या फटाक्या विक्रेत्यांनी फटाके विक्रीच्या शेड लगातार स्टॉल उभारण्यात आले तर प्रत्येक दुकानात आगी विझवण्यासाठी पाणी आणि वाळूने भरलेल्या बादल्या तयार आसने गरजेचे आहे मात्र संबंधित फटाके स्टॉलवर पाण्याच्या टाक्या २००लिटरच्या नाममात्र असून वाळूच्या बकेट सुद्धा नाममात्र आहेत.तर दुकानात कोणतीही उघडी किंवा सैल विद्युत वायर नसावी. फक्त मान्यताप्राप्त दर्जाच्या (Standard) केबल्स वापराव्यात परंतु अनेक दुकानात लोकल केबल वापरण्यात आले आहेत. तर अनेक दुकाना परवान्यामध्ये (License) नमूद केलेल्या क्षमतेपेक्षा जास्त फटाक्यांचा साठा दुकानांमध्ये ठेवण्यात आला आहे दुकानाच्या बाहेर आणि आत ‘धूम्रपान निषेध’ (No Smoking) चे फलक ठळकपणे लावलेले नाहीत दुसरीकडे फटाक्यांच्या दुकानाजवळ किंवा स्टॉलजवळ वाहने पार्क करण्यात येत आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीसाठी शासनाने आणि संबंधित प्रशासनाने कठोर सुरक्षा नियम व अटी घालून दिल्या असतानाही या फटाका दुकानदाराकडून नियमांची अक्षरशः पायमल्ली केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. फटाके विक्रीच्या ठिकाणी सुरक्षिततेचे निकष पाळले जात नाहीत, याची प्रत्यक्ष तपासणी कोण करणार आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई कोण करणार, असा संतप्त सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close