ईतर

ना.ॲड.इंद्रनील नाईकांच्या पाठपुराव्याला यश; पुसदला मृद व जलसंधारणाचे स्वतंत्र कार्यालय!

पुसद :  तालुक्यातील मृद व जलसंधारणाच्या कामांना अधिक गती मिळावी, यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू करण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पुसद येथे मृद व जलसंधारण विभागाचे नवीन उपविभागीय कार्यालय सुरू करण्यास महायुती सरकारने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन आदेश ५ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला.

पुसद तालुक्यात मृद व जलसंधारणाशी संबंधित विविध कामांचे वाढते प्रमाण लक्षात घेता स्वतंत्र कार्यालयाची आवश्यकता होती. या निर्णयामुळे जलसंधारण, मृदसंवर्धन, सिंचन तसेच शेतीशी संबंधित विविध योजनांचे नियोजन व अंमलबजावणी स्थानिक पातळीवर अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.सध्या तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जलसाठ्यांचे संवर्धन, पाण्याचे नियोजन आणि मृदसंवर्धनाच्या कामांना स्थानिक स्तरावर गती मिळण्यास मदत होणार असून, शेतकरी व नागरिकांची प्रशासकीय कामांसाठी होणारी धावपळही कमी होणार आहे.पुसद तालुक्याच्या दीर्घकालीन जलसुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात असून, स्वतंत्र कार्यालयामुळे मृद व जलसंधारणाच्या कामांना अधिक बळ मिळून दुष्काळावर मात करण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close