ईतर

पुसद मतदार संघातील रस्ते व पुलाच्या विकास कामांसाठी अर्थसंकल्पात ४२ कोटी मंजुर!-ना.इंद्रनील नाईक यांच्या पाठपुराव्याला यश!

पुसद : महाराष्ट्र राज्याचा२०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दि.६ मार्च २०२६ रोजी विधानसभेत सादर केला. हा अर्थसंकल्प राज्यातील सर्व घटकांना न्याय देणारा, विकासाला गती देणारा तसेच शेतकरी, महिला, युवक आणि उद्योग क्षेत्राला बळकटी देणारा आशावादी अर्थसंकल्प म्हणून पाहिला जात आहे.या अर्थसंकल्पात पुसद मतदार संघांसाठी महत्त्वपूर्ण निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पुसद तालुक्यातील राज्य मार्ग, जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग तसेच त्या मार्गांवरील पुलांच्या बांधकामासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे पुसद मतदार संघातील रस्ते व दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.पुसद मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी जणू विकासाचा चंगच बांधला आहे. पुसदसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत आहे. नुकत्याच मागील आठवड्यात औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी(एमआयडीसी) पुसद मधील उद्योगांना चालना देण्यासाठी व स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ७२ कोटी रुपयांचा निधी औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी (एमआयडीसी) च्या पायाभूत सुविधांसाठी मंजूर करून आणण्यात आला आहे.त्यानंतर आता अर्थसंकल्पातून पुसद मतदार संघातील रस्त्यांच्या विकासासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्यामुळे येत्या काळात पुसद मतदार संघातील रस्ते अधिक दर्जेदार व सुरक्षित होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निधीमुळे मतदार संघातील विकासाला नवी गती मिळणार असून उद्योग, व्यापार आणि दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पुसदच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न कायम राहील असा विश्वास राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केला.

पुसद मतदार संघातील उद्योग, रोजगार व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नाईक परिवार सातत्याने काम करत आहे आणि राहील-राज्यमंत्री इंद्रनील नाईक….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close