जिल्हास्तरीय स्पर्धेत वालतूर तांबडे शाळा ठरली उपचॅम्पियन

पुसद:जिल्हा परिषद यवतमाळ खेळ, क्रीडा व कला संवर्धन मंडळ यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 05 फेब्रुवारी ते 07 फेब्रुवारी 2026 जिल्हा क्रीडा संकुल यवतमाळ येथे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळ जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा वालतुर तांबडे या शाळेने वयोगट 6 ते 11 व 11 ते 14 या वयोगटात उपचॅम्पियनशिप मिळवली. सलग दुसऱ्या वर्षी जिल्हास्तरीय उपचॅम्पियनशिप मिळवून वालतुर तांबडे या शाळेने इतिहास घडवला. वयोगट 6 ते 11 खो खो खेळात मुली विजयी ठरल्या. 4×100 रिले या धावण्याच्या स्पर्धेत मुली विजयी ठरल्या. लांब उडी स्पर्धेत कुमारी परिदी गव्हाळे द्वितीय आली .वयोगट 11 ते 14 खो खो या खेळात मुले उपविजेते ठरले. 4×100 रेले प्रकारात मुले प्रथम व मुली द्वितीय आल्या. 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत चाहत जाधव प्रथम. 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत आराध्या गव्हाळे द्वितीय. लांब उडी भावेश राठोड द्वितीय.थाळीफेक मध्ये आर्यन राठोड प्रथम आला. त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मधुकर मोरझडे, शिक्षक भारत राठोड,विकास वाकडे, प्रफुल्ल पांडे,जयसिंग चव्हाण, रोहिदास पवार,श्रीराम आढाव, संभाजी हंगरगे,विक्रम राठोड यांनी अभिनंदन केले. तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी संजयजी राठोड , विस्तार अधिकारी उमेश वाघमारे, अमित बोजेवार, चोंढी केंद्राचे केंद्र समन्वयक प्रल्हाद जाधव,तालुका क्रीडा सचिव गोविंद जाधव व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष तांबारे, आलासिंग राठोड, बीबीषण राठोड, सदानंद राठोड, दिलीप जाधव, परमानंद राठोड, प्रकाश चिरंगे, राहुल जाधव,बलदेव राठोड, उदल जाधव,रविराज राठोड,गजानन हमाने, चंदल पवार,उल्हास राठोड, केवल भिसे व समस्त ग्रामस्थांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.



