पुसद शहरात एकहाती सत्ता असूनही राष्ट्रवादी(अप)पक्षाच्या उमेदवार काठावर पास! ॲड.मोहिनीताई इंद्रनील नाईक यांचा विजय तर डॉ.मोहम्मद नदिम या चुरशीच्या लढाई ६६८ मतांने पराभूत!
६६८ मताने फिरला निकाल! सत्ताधारी पक्षाच्या काना जळून गेली गोळी!

पुसद : पुसद नगर परिषदेचा धक्कादायक निकाल समोर आला आहे.या नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी घराणेशाही सत्ताधारी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या धर्मपत्नी सौ. मोहिनीताई नाईक विरुद्ध महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाचे डॉ. मोहम्मद नदिम यांच्यात ‘काटे की टक्कर’ खरी चुरस पाहायला मिळाली असली तरीही अत्यंत थरारक निकाल समोर आला आहे. मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या या लढतीत येथे राज्यमंत्री व सत्ताधारी घराण्यातील एका महिला उमेदवाराने अवघ्या ६६८ मताच्या फरकाने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत विजय संपादन करीत बाजी मारली असून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या काना जवळून गोळी गेल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जबरदस्त धक्का बसला असून मागील काळात असलेले उमेदवार सुद्धा राखता आले नाही तर शिवसेना शिंदे गटाचा सुपडा साफ झाला आहे.
पुसद नगर परिषदेच्या सार्वत्रिकय निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी नाईक घराण्याचे वर्चस्व सिद्ध करत मोठे यश मिळवले आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्याही उमेदवारांनी विजय मिळविला आहे. याउलट महाविकास आघाडीला केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे.तर भाजपला आपले मागील काळातील जे उमेदवार होते तेही सांभाळता आले नाही तर शिवसेना शिंदे गटाचा सुपडा साफ झाला असून निवडणुकांचा निकाल अखेर स्पष्ट झाला असून, या निकालांनी केवळ राजकीय पक्षांचे गणितच नव्हे तर अनेक कुटुंबांमधील नातेसंबंधांचीही परीक्षा घेतली जाणार आहे.या ठिकाणी सून विजयी ठरली तर दुसऱ्या पक्षातील पतीदेवांच्या सख्या भावांच्या पक्षाला पराभव स्वीकारावा लागल्याने येणाऱ्या काळात या शहरातील राजकीय गणित बदलले जाणार आहे तर अनेक पक्षातील राजकीय नेत्यांच्या पदरी पराभव आल्याने या नेत्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.या नगर परिषदेच्या निवडणुकीचा धुराळा आता शांत झाला असला, तरी निकालातील आकडेवारीने मात्र राजकीय विश्लेषकांची झोप उडवित आहेत. नाईक घराण्याची पुण्याई तसेच सत्तेचा वरदहस्त आणि सहा खात्याच्या मंत्री पदाचे बळ असतानाही गेल्या ७० वर्षापासून एक हाती सत्ता असूनही तरीही ज्येष्ठ नेते माजी मंत्री मनोहरराव नाईक यांची प्रकृती चांगली नसतानाही त्यांना या निवडणुकीत ढाल बनून उभे राहावे लागले नाईक घराण्याने आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला असला, तरी यावेळचा विजय हा ‘काना जवळुन गोळी गेल्याने निसटता विजय’ आहे.
नाईक घराण्यासाठी मताधिक्य घटले ही मात्र आगामी काळासाठी मोठा संकेत मानला जात असल्याची चर्चा आता शहराच्या चौकाचौकात रंगू लागली आहे.सन २०१६ ते २०२५ आकड्यांचा खेळ मांडला जात आहे.राजकारणात आकडे कधीच खोटं बोलत नाहीत. सन २०१६ च्या निवडणुकीत जेव्हा नाईक कुटुंबाकडे कोणतेही मंत्रिपद नव्हते, तेव्हा अनिता मनोहरराव नाईक यांनी तब्बल २०२८ मतांची आघाडी घेवून विजय झाल्या होत्या मात्र, यंदाच्या निवडणुकीत सर्व सत्ता समीकरणे अनुकूल असतांनाही सहा खात्याची राज्यमंत्री असतांनाही मोहिनी इंद्रनिल नाईक यांना प्रथमच शहरातील प्रत्येक वर्गातील गल्ली गल्ली पछाडावा लागली जस्ट नाईक साहेबांना सुद्धा या निवडणुकीत बंगल्याच्या बाहेर काढावे लागले तरीही हा विजय अवघ्या ६६८ मतांवर येऊन ठेपला. मागील निवडणुकीत व या निवडणुकीत तब्बल १३६० मतांची ही ‘गळती’ नेमकी कशामुळे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.विजयाचा जल्लोष होत असतानाच एका जागरूक मतदाराने पत्राद्वारे नाईक पॅनेलला घरचा आहेर दिला आहे. पत्रातील शब्दांनी थेट मर्मावर बोट ठेवले आहे.हा विजय म्हणजे विजयाचा आनंद साजरा करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. हा विजय केवळ थोडक्यात बचावल्यासारखा आहे.मंत्रिपद आणि सत्ता असतानाही मताधिक्य घटने, हे विकासाच्या कामात कुठेतरी कसर राहिल्याचे लक्षण तर नाही नां? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.जर पुढच्या वेळी अध्यक्षपद आणि पॅनेल टिकवायचे असेल, तर केवळ नावावर नाही, तर कामाच्या उत्तम दर्जावर लक्ष द्यावे लागेल.विकासाचा ‘अल्टिमेटम’देत आता तरी कायापालट होणार कां?पुसद शहराचा सर्वांगीण विकास हिच आता नाईक पॅनेलसाठी ‘अग्निपरीक्षा’ ठरणार आहे. रस्ते, पाणी आणि नागरी सुविधांचा दर्जा जर उत्तम नसेल, तर पुढच्या पाच वर्षांत हे उरलेले ६६८ मतांचे अंतर कापायला विरोधकांना वेळ लागणार नाही. शुभेच्छांसोबतच मिळालेला हा ‘नम्रतेच इशारा’ नाईक घराण्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे कां? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यंदा ९ नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारापैकी ३ नगराध्यक्षांवर मतदारांनी मतदानाचा पाऊस पडला आहे.पहिला क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मोहिनी नाईक यांना पसंती दिली व त्या थोड्या काय फरकाने विजय झाल्या मात्र त्यांच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीच्या सहकारी पक्षाचे काँग्रेचे उमेदवार डॉ. मोहम्मद नदिम यांचा काही मतांनी पराभव झालातरीही ते मनमिळाऊ असल्यामुळे व राजकारणाचा चांगला अभ्यास नेता असल्यामुळे त्यांनाही शहरातील सर्वच जाती धर्माच्या लोकांनी भरभरून मतदान केले त्यांच्या विजयाची खात्री महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना होती.त्या खालोखाल भाजपाचे निखिल चिद्दरवार हे तिसऱ्या क्रमांकाचे इतर सहा नगराध्यक्षांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदान घेऊन पराभव झालेले उमेदवार होते.प्रभाग क्रमांक १ अ व ब मधून राजू दुधे व जयश्री दुबे या पती-पत्नीने विजयाचा गुलाल उधळला आहे. तर राजू दुधे हे अध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उभे राहिले होते.त्यामुळे त्यांचा त्या ठिकाणी दारुण पराभव झाला होता.नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोहिनी नाईक यांना १३०१९ मते मिळाली आहेत. तर काँग्रेस पक्षाचे डॉ.मो. नदिम यांना १२,३५१ मत मिळाली आहे.त्या दोघांच्याही मताचे ६६८ अंतर एवढे होते.त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार डॉ.मो. नदीम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार मोहिनी नाईक यांना चांगलीच काटे की टक्कर झाल्याचे चित्र समोर आली आहे.त्या खालोखाल भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निखिल चिद्दरवार यांना ८ हजार ५०४ मतं मिळाली आहे.तर नगराध्यक्षाच्या ईव्हीएमवरील नोटाला २०६ मतदारांनी पसंती दिली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये नव्याने मंत्री झालेले इंद्रनील नाईक यांना त्यांचा बालेकिल्ला राखण्यात यश मिळाले आहे.पुसद नगर पालिकेवर ३१ नगरसेवक मतदारांना निवडून द्यावयाचे होते.त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १६ नगरसेवक निवडून आले आहे.तर काँग्रेस पक्षाचे ६ नगरसेवक, बीजेपीचे ५ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ३ नगरसेवक निवडून आले आहे.तर एक अपक्ष देखील यंदाच्या निवडणुकीत निवडून आला आहे. पुसद येथील दवा बाजार समोरील योगाभवन येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडताना हजारोंच्या संख्येने सर्व पक्षाचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. त्यामुळे सर्वत्र रस्ता ब्लॉक झाला होता.कुठलीही अपरिहार्य घटना घडू नये यासाठी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणी सुरू होताच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोहिनी नाईक हे सुरुवातीपासूनच आघाडी घेत होत्या. तर त्यांच्या पाठीमागे काही अंतरावरच डॉ.नदीम देखील आघाडी घेत होते. ७ टेबलावर एकूण ११ फेऱ्या होत्या.त्यामुळे प्रत्येक फेरीमध्ये मोहिनी नाईक हे त्यांच्या विजयाचा गाडा ढकलत होत्या. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे कार्यकर्त्यांना माहीत होताच त्यांनी जल्लोष साजरा करण्यासाठी सर्व तयारी केली होती.त्याचं नेतृत्व बंगल्यात बसून असलेल्या असलेले मंत्री इंद्रनील नाईक हे करीत होते.अंतिम टप्प्यामध्ये मोहिनी नाईक ने आघाडी घेतल्यामुळे त्यांच्या विजयाचा गुलाल उधळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी क्षणाचाही विलंब न करता फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला होता.येथील नाईक चौकामध्ये कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून काढला होता.नगरसेवकाच्या रिंगणात उभे राहिलेल्या उमेदवारांच्या ईव्हीएम मशीनवर १,२३२ मतदारांनी नोटाचे बटन दाबले होते. नाईकांनी गड राखला तरीही या सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या काना जवळून गोळी गेल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे या निवडणूक भारतीय जनता पक्षाला जबरदस्त धक्का बसला असून मागील काळात असलेले उमेदवार सुद्धा रक्त आले नाही तर शिवसेना शिंदे गटाचा सुपडा साप झाला आहे.
असे आहेत नगरसेवक पदासाठी विजयी उमेदवार !
प्रभाग क्रमांक मिळालेले मतदान
प्रभाग क्रमांक१ अ जयश्री दुधे १२०८,
ब राजू दुधे ९१९,
प्रभाग क्रमांक२ अ कल्पना शिकारे १,६५८,
ब ऋषिकेश पंडितकर ९२५,
प्रभाग क्रं.३ अ खान मजहर ताहेर १,७८२,
ब सैय्यद रुकय्या बेगम मुजफरोद्दीन १,६७६,
प्रभाग क्रं.४ अ अभिजीत पानपट्टे. १,४०७,
ब विशाखा गवळी १,२२८,
प्रभाग क्रं.५ अ अक्षय महाकाळ १,२९९ ,
ब जयश्री डुब्बेवार ९३४,
प्रभाग क्रं.६ अ शुभांगी गुद्टटवार १००१,
ब राजेश साळुंके १,१४१,
प्रभाग क्रं.७ अ योगिता नेमायते १,६९४,
ब शेख जब्बार शेख युसूफ १,०२५,
प्रभाग क्रं.८ अ शेख सुलतान शेख अब्दुल १,९९५,
ब खान अमरीन गाजी उस्समा. २,०९९,
प्रभाग क्रं.९ अ समीना खानम फिरोज खान १,४२८,
ब डॉ.मो. नदिम १,३१५,
प्रभाग क्रं.१० अ ऐश्वर्या साळुंके (बोरकर). ६७०,
ब जगदीश पवार ९९०,
प्रभाग क्रं.११ अ विठ्ठल खडसे १,०१९,
ब शिल्पा देशमुख १,०१०,
प्रभाग क्रं.१२ अ शिवाजी खडसे ८२७,
ब अर्चना जगताप १,९२९,
प्रभाग क्रं.१३ अ सविता घाटे ९२९,
ब डॉ.अकिल जुसुब मेमन . १,१७९,
प्रभाग क्रं.१४ अ अशंका कांबळे . ६३२,
ब ॲड. भारत जाधव ७८०,
प्रभाग क्रं.१५ अ दिपाली जाधव ८८७,
ब अश्विनी जिल्हेवार १,७८०,
क दीपक काळे. १,४४३,