पुसद शहरात राजकीय घराणेशाही, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सौभाग्यवती नगराध्यक्षपदाच्या रिंगणात; कोणाची राजकीय प्रतिष्ठा पणाला?
'मी नाही तर माझा वारस! 'घराणेशाहीचा फटका कार्यकर्त्यांना!

पुसद : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात अस बोलल्या जातं. मात्र प्रत्यक्ष पाहता या निवडणुकीत मंत्र्याच्या आणि प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबातील सदस्याला आणि नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद शहरासाठी विविध योजनेअंतर्गत विकास निधी खेचून आणला आहे. येणाऱ्या काळात त्या विकास निधीतील कामाची टक्केवारी दुसरा भागीदार होऊ नये म्हणूनचं निष्ठावंत कार्यकर्त्यांना बगल देऊन पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सौभाग्यवती या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरविल्याची चर्चा शहरात सुरू आहे.विधानसभा निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर लोकप्रतिनिधींचा दणदणीत विजय झाला. त्याच कार्यकर्त्यांची ऋण फेडण्याची संधी आली असताना या लोकप्रतिनिधींनी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बगल देऊन सत्तेची मलाई चाखण्याच्या हेतूने स्त्री हटा्पायी आपल्याच घरातच सर्व पदे ठेवून घराणेशाही लादुन सच्चा कार्यकर्त्यांना संपविण्याचे कट कारस्थान सुरू केले असल्यने या निवडणुकांत ‘फॅमिली पॅकेज’चा उघड उघड पुरस्कार केल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नक्की किती दिवस निष्ठा टिकणार हा मात्र संशोधनाचा विषय आहे.?
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका नेक वर्षांनी होत असल्यामुळे पुसद शहरातील तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात उमेदवारीच्या रणांगणावर उतरले चेहरे पाहिले तर चित्र उलटचं चक्क राज्यमंत्र्यांनी आपल्याच घरातून नगराध्यक्षपदासाठी महायुतीला तिलांजली देऊन शहरात विकास निधी खेचून आणलेल्या कामाची टक्केवारी इतर कोणालाही जाऊ नये या हेतूने राज्यमंत्र्यांनी स्त्रीहट्टापाई त्यांच्या सौभाग्यवती सौ. मोहिनी ताई नाईक यांना नगराध्यक्ष पदांसाठी निवडणूक रिंगणात उतरविले असल्याची सूत्राची माहिती आहे मात्र पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे मेहनत करायची आणि जेव्हा पदाची वेळ येते तेंव्हा पृस्कृत होतात ते घराण्यातीलचं..पण सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आपल्या कुटुंबियांसाठी राजकीय पायवाटा मोकळ्या करण्याचा हा उघडपणे दिसणाऱ्या ट्रेंडमुळे आता निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचं वादळ निर्माण झाले आहे.कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या , आणि फ्लेक्स लावायचे का.? या नेत्यासाठी व पक्षासाठी कार्यकर्त्यांनी कष्ट घ्यायचे आणि सर्व पदे नेत्याच्या घरांत द्यायची अशावेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांवरचं कां? कार्यकर्ते भगवे कपडे घालून हिमालयात जाण्यासाठी राजकारणात आले कां? अशा प्रस्थापित घराण्यांला सत्तेची लालसा आणि पैशाचा उन्माद या निवडणुकीत कार्यकर्ता दाखवेल तसेच विधानसभेच्या निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर लोकप्रतिनिधींचा विजय सोपा झाला. त्याच कार्यकर्त्यांची ऋण फेडण्याची आज संधी मिळाली असताना मात्र या या प्रस्थापित नेत्यांनी आपल्याच घराचा विचार करून सर्व पदे घरात ठेवून घराणेशाही लादण्याचा प्रयत्न केला आहे.अशावेळी या नेत्यांना सामन्य कार्यकर्ता दिसला नाही. तेव्हा फक्त आपले सगे सोयरे दिसतात.त्या ऐवजी एखाद्या नव्या दमाच्या , सामन्य कार्यकर्त्यांना ज्याने आजन्म ह्या राजकीय घराण्यांची सेवा केली असा कार्यकर्ता दिसत नाही कां.? हे कार्यकर्ते फक्त तुमचे फ्लेक्स लावण्यासाठी, सतरंज्या, खुर्च्या उचलण्यासाठी व साहेबांचा जय जय कार करण्यासाठी एवढ्या पुरतेच आहेत का?.. असा सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याचा टाहो.. ऐकायला मिळत आहे.त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या आश्वासनाला या प्रस्थापित नेत्यांनीच तिलांजली दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. परिणामी नगराध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा घराणेशाही उफाळून आली असून, राज्यमंत्र्यांनी आपल्या सौभाग्यवती सौ.मोहिनी ताई नाईक यांना वारसदार म्हणून ऐनवेळी नगराध्यक्ष या पदासाठी रिंगणात उतरविण्यात आल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून घराणेशाही चा फटका निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसला आहे. पण या निवडणुकीत कुणाची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली हा मात्र काळ आणि वेळ दाखवेल पण हेही सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ता सांगू शकेल..



