Uncategorizedराजकिय

येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी शहरात जनतेच्या हितासाठी सामाजिक कार्यकर्त्याचा वनवा! इच्छुकांची भाऊ गर्दी!

पुसद : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आणि प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे पुसद नगरपरिषदेचा होणारा भावी नगराध्यक्ष कोण, याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये नगरपरीषेदेच्या निवडणुका होण्याची शकता वर्तवली जात आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये हालचालींना वेग आला आहे. होणाऱ्या पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून देयाचा आहे मागील पंधरा वर्षापासून या नगरपरिषदेवर महिला राज होते त्यामुळे हे पद पुन्हा खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने काहीजण सध्या मतदारांच्या दारात नम्रतेचा अभिनय करीत आहे. “मीच या शहराचा विकास करतो” मी जनतेसाठी जगतो असे आव आनत आहेत. काही इच्छुकांच्या खांद्यावर शाल गळ्यात फुलांची माळ आणि चेहऱ्यावर हसू पण मनात कपट आहे. म्हणून मतदार राजा तू सावधान सध्या राजकारणात काही इच्छुक ‘उमेदवार’ असे आहेत की त्यांनी नाटकाची संपूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे इच्छुकांनी आपापला कोणता प्रभाग सोईचा राहील याची प्रत्येक प्रभागातील कार्यकर्ते चाचपणी करीत असून भावी नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी तिकीट मिळवण्यासाठी चढाओढ लागली आहे.आपापल्या पक्षाकडे हे इच्छुक उमेदवार मोर्चे बांधणी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु आगामी निवडणुकीत नगरपरिषदे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे जे इच्छुक आहेत त्यांनी यापूर्वी सुद्धा सत्तेची फळे चाखली आहे त्यामुळे सत्तेच्या लालचे पोटी तसेच या सत्तेच्या माध्यमातून काहींनी या स्वराज्य संस्थेमध्ये स्वहितासाठी ठेकेदारी करणारे लोकच नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी मलिदा चाखण्याच्या हेतूने पुन्हा नगर परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी तयारी करीत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरात सर्वच पक्षात समाजसेवा करणाऱ्या चांगल्या सामाजिक कार्यकर्त्याचा वनवा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.पुसद शहरात महायुती आणि महाविकास आघाडी राजकीय पक्ष आहेत. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दादा गट यांची महायुती आहे. तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) आणि शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) यांची महाविकास आघाडी आहे.

 

माजी नगरसेवक डॉ नदीम यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी मागितली आहे.डॉ नदीम हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी यापूर्वी पुसद नगरपरिषदेचे अनेकवेळा नगरसेवक उपाध्यक्ष पद भूषविले आहे. ते राजकारणात व सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असून त्यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. तसेच त्यांचा शहरातील विविध भागात प्रत्येक समाज जाती धर्माच्या नागरिका दांडगा जनसंपर्क आहे.

तर नगराध्यक्ष पदासाठी दुसरे इच्छुक राजु भाऊ दुधे यांनाही राजकारणाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती हे पद अनेक वर्ष भूषविले आहेत. पुसद विधान सभा मतदारसंघाचे आ. इंद्रनील नाईक यांचे ते कट्टर समर्थक आहेत. राजू भाऊ दुधे यांचाही मित्र परिवार दांडगा आहे.तर महायुतीतील दुसरा पक्ष भारतीय जनता पक्ष युती न झाल्यास स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्धार केला असल्यामुळे अध्यक्ष पदासाठी भाजपाचे अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहे.त्यामध्ये राजकीय गुरु- शिष्य असलेले विनोद जिल्हे वार व निखिल चिदर्वार तसेच एक बहुजन चेहरा म्हणून निळकंठ पाटील तसेच अश्विन भैया जैयस्वाल, डॉ.अर्चना जैयस्वाल, रवी ग्यानचंदानी, यांनी पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी मोर्चे बांधणी केली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद जिल्हावार पुसद शहरात सर्वसामान्यांना परिचित असलेले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी पुसद शहरात भाजपच्या पडत्या काळातही भाजपला जिवंत ठेवण्याचे काम केले ते पक्षाचे एककनिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तसेच त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदे पैकी पुसद नगर परिषदचे भाजपचे पहिले नगरसेवक निवडून आल्याचा बहुमान मिळवला होता. व्यापार आणि शेती सांभाळात ते भाजपाचे सध्या जिल्हा किशन मोर्चा चे अध्यक्ष आहेत. ते हुशार राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, त्यामुळे ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रबळ उमेदवार आहेत.

भाजपाचे दुसरे इच्छुक उमेदवारम्हणून निखिल चीद्दरवार अध्यक्षपदासाठी पुढे येत आहे. त्यांनीही नगरपरिषदेच्या २०१६च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून नगरसेवक झाले भाजपाचे गटनेते म्हणून पद भूषवले आहे. त्यांनाही शहरात मानणारा मोठा वर्ग आहे. तत्कालीन अर्थमंत्री सुधीर भाऊ मनगुटीवार यांच्याकडून पुसद शहरात व प्रभाग क्रं.५ मध्ये विविध कामात वेगळ्या पद्धतीने निधी खेचून आणून त्यांनी कामे करून घेतली त्यामुळे भाजप मधील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

तसेच तिसरे भाजपचे पदाधिकारी रवी ग्यानचंदानी हे व्यवसायाने कापड व्यापारी असले तरी ते हिंदू समाजाच्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत.ते सध्या पुसद जिल्हा उपाध्यक्ष भाजपा म्हणून पक्षात कार्यरत आहेत ते तन मन धनाने ताकदिने नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

तर चौथे भाजपाचे अश्विन भैया जैयस्वाल व त्यांच्या सुविज्ञ पत्नी डॉ. अर्चना अश्विन जैयस्वाल यांनी शहराध्यक्ष निलेश पेन्शनवार यांच्याकडे रितसर अर्ज भरुन उमेदवारी मागितली असल्याची सूत्राची माहिती आहे. २०१६ ला झालेल्या पुसद नगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये डॉ. अर्चना अश्विन जैयस्वाल या भाजपाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उभ्या होत्या. त्यांचा केवळ १८०० मतांनी पराभव झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ.अनिता मनोहरराव नाईक यंनी २०१६ च्या निवडणुकीत १४६८७ मते घेतली होती तर डॉ. अर्चना जैयस्वाल यांना १२८८७ मते मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा पक्षाकडे डॉ. अर्चना जैयस्वाल व अश्विन भैया जैयस्वाल यांना उमेदवारी मागितली आहे. परंतु पुरुष उमेदवार दिल्यास तसेच मागच्या निवडणुकीचा विचार केल्यास अश्विन जैयस्वाल हे अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे चित्र आहे. 

तर महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ज्येष्ठ नेते डॉ. मेमन साहेब हे पेशाने वैद्यकीय व्यावसायीक म्हणून पुसद शहरात सर्वसामान्यांना परिचित आहेत त्यांनी अनेक वेळा नगरपरिषदेचे नगरसेवक तसेच उपाध्यक्ष पद भोगले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे हुशार राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, परंतु शहरातील राजकीय परिस्थितीचा विचार केला असल्यास सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्ष किती जागा लढवेल याचा मात्र येणारा काळ ठरवेल.

तसेच महायुतीच्या घटक पक्षातील तिसरा पक्ष शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते राजन मुखरे हे सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे सूत्राची माहिती असून त्यांचाही एक वेगळा चाहता वर्ग आहे. परंतु महायुतीतील घटक पक्षातील सर्व सम राहिल्यास महायुती सत्तेत बसू शकेल परंतु नाईक कुटुंबातून किंवा  घराण्यातून इच्छुक उमेदवार दिल्यास या महायुतीच्या तांगतिंगाडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदारांनो तुमचा खरा नेता ओळखा तो जो शिक्षण आरोग्य शिस्त आणि पारदर्शकता याबाबत बोलतो तो जो तुमच्याशी निवडणुकीनंतरही संवाद ठेवतो तो तुमचे काही नेतेच असु शकतात बाकी काही नेते फक्त सेल्फीसाठी सजलेले कलाकार आहेत ज्यांनी मुखवटे चढवले आहे त्यांचा खरा चेहरा ओळखा येणाऱ्या निवडणुकीच्या काळात खोट्या आश्वासनाच्या गर्दीत तुमचा विवेक तुमचे खरे शस्त्र आहे. मतदार राजा यावेळेस हात जोडून उभे असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे नीट बघा कपटी नेत्यांनी गोंधळ घालून तुमचं मत खरेदी करू देऊ नका ‘मत म्हणजे फक्त बोटावरची शाई नाही’ ती तुमच्या शहराच्या विकासाची भविष्यातली “शिक्कामोर्तब” जबाबदारी आहे.येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या काळात अनेक इच्छुक उमेदवार नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवक पदासाठी शहरातील अनेक कंत्राटदार ठेकेदार इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे यामध्ये कोणत्या राजकीय पक्षाने कोणास उमेदवारी दिल्यास कोण अध्यक्षपदाची निवडणूक लढविल व या शहराचा कोण नगराध्यक्ष व नगरसेवक होईल हे मात्र वेळच सांगेल परंतु या शहरात तरुण कार्यकर्ता सामाजिक कार्याकर्ता पुढे येऊन काम करताना सर्वसामान्याच्या अडीअडचणी सोडविण्याचा सतत प्रयत्न करीत असताना दिसत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या मात्र वनवा पसरला आहे. त्यामुळे येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा ठेकेदारांचे किंवा कंत्राटदाराचे राज येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जनतेने सावधानतेने कोणत्याही जाती- धर्माला किंवा कोणत्याही अमिषाला बळी न पडता आपला सुसंस्कृत व उच्चशिक्षित नगरसेवक नगराध्यक्ष निवडावा जेणेकरून या शहराची भरभराटी होईल यासाठी जनतेनी विचारपूर्वक सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवुनच नेता निवडा हेच झेप न्यूज मीडियाचे आव्हान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close