राजकिय

कोण होणार तुमचा नगराध्यक्ष? पुसद नगरपरिषद आरक्षण जाहीर झाल्याने उत्सुकांची गुडघ्याला बाशिंग बांधून भाऊगर्दी!

आरक्षणाचा बिगुल वाजताच सत्ता संतुलनाचा खेळ सुरू!

पुसद : नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे नुक्तेच आरक्षण जाहीर झाल्याने या नगरपरिषदेला नगराध्यक्ष पदासाठी गेल्या १५ वर्षानंतर खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने उत्सुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून भाऊगर्दी सुरू केली आहे.तर अनेक  राजकीय पक्षांकडून सत्ता संतुलनाचा खेळ सुरू झाला आहे.मात्र येत्या काळात आरक्षणामुळे राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे चित्र आहे.पंरतु बहुतांश नेतेमंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र, प्रस्थापित पक्ष या निवडणुकीत पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी राजकीय घराण्यातील उमेदवार लादणार असल्याचे चित्र दिसत असल्याने महायुतीच्या पक्षातील नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली असून या नेतेमंडळीमध्ये कहीं खुशी कहीं गमचा सूर उमटत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले उत्साही नेते ,पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.‌राज्य शासनाच्या  नगर विकास विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार या आरक्षणाच्या यादीनुसार अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पुसद नगर परिषदचे नगरध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुसद शहरातील आरक्षणाच्या या नव्या फेरबदलानंतर येथील अनेक जुन्या दावेदारांच्या समीकरणांमध्ये बदल होणार आहे. आरक्षणानंतर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.या निर्णयानंतर महायुती पक्षातील अनेक महिला नेत्यांमध्ये उत्सुकता पुसद नगर परिषदेचे अध्यक्षपद मिळावे म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत परंतु या नगर परिषदेमध्ये मागील टर्म महिला नगराध्यक्षपदी विराजमान असल्यायाने  या निवडणुकीत मात्र महिला उमेदवारास डावलण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वच पक्षातून उत्साही इच्छुक नेते पदाधिकारी कार्यकर्त्याची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता महिलांना संधी मिळणार नसल्याने स्थानिक राजकारणात पुरुष उमेदवारामध्ये नवा उत्साह दिसून येत आहे.नगराध्यक्ष पदाची गेली अनेक वर्षे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अक्षरश: सुटकेचा निश्वास सोडला आणि आरक्षण जाहीर झाले तेव्हापासू शहरांतील विविध पक्षाचे इच्छुकांची भाऊगर्दी करणाऱ्यांनी  संपर्क वाढवायला सुरुवात केली असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. अनेक वर्षे या संधीची वाट पाहत असलेल्या इच्छुकांसाठी ही निवडणूक येत्या काळात पर्वणी ठरणार आहे . आता लढती कशा प्रकारच्या होतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.परंतु महायुती व महाविकास आघाडीच्या  सहभागी पक्षातील  कार्यकर्ते पदाधिकारी या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संबंध चांगले राहिले तर किंवा युती आघाड्यात निवडणुका लढल्या किंवा समीकरणे बदलली तर कोण होणार  नगराध्यक्ष यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. जर हे सर्व युती आघाडी एकमेकाच्या विरोधात लढले तर अनेकांची स्वप्नं धुळीला मिळण्याची शक्यता आहे. मात्र या दोन्ही आघाड्यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला तर अनेकांना संधी मिळू शकते. परंतु विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे आत्ताच खात्रीने सांगणे अवघड आहे.  पुसद नगर परिषदेत महायुतीच्या पक्षाची सत्ता आहे. परंतु मागील काळात नगरपरिषदेमध्ये विरोधी बाकावर भारतीय जनता पक्ष होता परंतु आता युती झाली किंवा युतीत बिघाड झाला तर भाजपला मागील जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तेवढ्याही जागा मिळतील की नाही याची मात्र शांशकता आहे. पुसद मध्ये जर सहमतीने निवडणूक लढवायची ठरल्यास येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा प्रबळ आहे. तरीही भारतीय जनता पक्षाला इथे डावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नगरपरिषदेवर प्रस्थापित नाईक घराण्याची गेल्या कित्येक वर्षापासून एक हाती सत्ता आहे. पण या सत्तेला मागच्या निवडणुकीत भाजपने सुरंग लावला होता असे चित्र होते राष्ट्रवादी पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा निष्टाता विजय झाला होता. त्यामुळे ही खुन्नस राष्ट्रवादी अजित पवार गट सोडणार नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीतील या शहरात मागील काही दिवसापासून शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे महाविकास आघाडीने एकत्रितपणे ही निवडणूक लढवली तर येत्या निवडणुकीत महाविकास आघाडी नगरपरिषद ताब्यात घेऊ शकतो अशी दबक्या आवाजात शहरात चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षानुवर्षे प्रस्थापितांच्या घरात सत्ता असून सुद्धा त्यांचा डोळा नगरपरिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदावर असल्याने राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे त्यांच्या सौभाग्यवती सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी ताई नाईक यांना समोर करून  नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावर दावा सांगण्याची जास्त शक्यता असल्याने त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी संभ्रमात आहे. नाईक कुटुंबातून पुन्हा उमेदवार दिल्यास लढाई तगडी होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली आहे. परंतु या निवडणुकीसाठी यामध्ये राजू दुधे (माजी पाणीपुरवठा सभापती), माजी नगरसेवक निशांत बयास आणि माजी आरोग्य सभापती राजेश सोळंके यांची नावे चर्चेत आहेत. हे सर्वजण दीर्घकाळ नगरपालिकेच्या कार्यात सक्रिय असून, अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. परंतु या नेत्याबद्दल शहरातील राजकीय पक्षात कडून जनता समाधानी आहे की नाही याचा वेध घेतला जात आहे. गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षाने मोठी भरारी घेतली होती व एक सक्षम विरोधी पक्ष नगर परिषदेमध्ये तयार केला होता परंतु या पक्षाने ज्या पक्षाच्या विरोधात वर्षानुवर्षे मतदान केले आज तोच पक्ष प्रस्थापितांची तळी उचलत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये या पक्षाबद्दल व पक्षातील जुन्या नगरसेवकाबद्दल नाराजी दिसून येत आहे.त्यामुळे भाजपाने आत्ता काही जुन्या पदाधिकाऱ्यांना टाळून नवीन उमेदवारास प्राधान्य देण्याच्या विचारात असल्याचे चित्र आहे.एकीकडे नगर परिषदेच्या अनेक कामांत अनेक माजी नगरसेवक कंत्राटदार असल्याने जनतेची कामे करण्याऐवजी तेच मलिदा चाखत आहेत.त्यामुळे अशा नगर सेवकांच्या भुलथापांना मतदार या निवडणुकीत कीती बळी पडतात हे मात्र संशोधनाचा विषय आहे.

येत्या काळात या निवडणुकीत  विनोद जिल्हेवार, माजी गटनेते निखिल चिद्दरवार, रवी ग्यानचंदानी, माजी सभापती नीरज पवार, आणि माजी नगरसेवक रूपाली जयस्वाल अशी नावं पुढे येत आहेत. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. मोहम्मद नदीम हे नगराध्यक्ष या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र ॲड. सचिन नाईक, अनिल शिंदे हे सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे समजते.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून न.प.माजी उपाध्यक्ष डॉ. अकिल मेमन आणि माजी

सभापती ॲड. भारत जाधव यांची नावे चर्चेत असून हा पक्ष अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे चित्र सुद्धा पहावयास मिळत आहे. त्यामुळे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येत्या काळात अधिकच चुरशीची होणार असून कोण कोणाचा गेम करणार हे मात्र येत्या काळात स्पष्ट होईल.

परंतु शिवसेनेच्या दोन्ही गटांचे चित्र मात्र अस्पष्ट आहे.तरही शिंदे गटाचे ॲड.उमाकांत पापीनवार हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे बोलल्या जात आहे तर उद्धव ठाकरे गटाचे ॲड . वीरेंद्र राजे हेही मात्र या निवडणुकीत सक्रिय होणार आहेत. तसेच एम आय एम पक्षाकडून माजी नगरसेवक शाकीब शहा, व जकी अन्वर हे उतरणार असल्याचे चित्र दिसत आहे अशी सूत्राची माहिती आहे. गेल्या१५ वर्षांनंतर खुल्या प्रवर्गासाठी हे आरक्षण जाहीर झाल्याने नगराध्यक्षपदावर कोण विराजमान होणार याची मात्र शहरातील जनतेला उत्सुकता लागली असली तरीही उत्सुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याने येथे भाऊगर्दी वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close