गणेश मंडळांसाठी मोठी संधी!पर्यावरण पूरक मुर्ती व उत्कृष्ट देखाव्यांना प्राधान्य ‘हे’ केल्यास मिळेल बक्षीस;भारती मैंद पतसंस्थेच्या वतीने स्पर्धेचे आयोजन!

पुसद:गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या आपुलकीचा विषय आहे. त्यामुळेच पुसद शहरात भव्य स्वरुपात गणेशोत्सव साजरा केला जातो. ठीक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते आपल्या मंडळाचा गणेशोत्सव कसा वेगळा आणि उत्तम होईल यासाठी प्रयत्न करत असतात. मागीलवर्षा पासून भारती मैंद पतसंस्थेच्या पुढाकाराने या गणेश मंडळांसाठी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केली जाते तर यावर्षी अशाच उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकूण १लाख८८हजार रुपये रोख बक्षीस सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुसद शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या भारती मैंद पतसंस्थेच्या वतीने मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही विविध चार श्रेणी च्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यास्पर्धेत पर्यावरण पूरक मुर्ती व सुंदर देखाव्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे या स्पर्धेत भाग घेणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना रोख१लाख ८८ हजार रु.ची रोख बक्षीस सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. पुसद शहर हद्दीतील सर्व नोंदणीकृत गणेश मंडळांसाठी भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे उत्कृष्ट श्री मूर्ती, गणेश मंडळांनी १० दिवसात राबविलेले उत्कृष्ट सामाजिक उपक्रम, उत्कृष्ट सजावट व गणरायांना निरोप देताना काढल्या जाणारी शिस्तबद्ध मिरवणूक या ४ श्रेणी साठी स्पर्धा आयोजित केली आहे.प्रत्येक श्रेणीत २१ हजार रु प्रथम,१५ हजार रु द्वितीय व ११हजार रु तृतीय असे१लाख ८८हजार रु चे रोख एकूण १२बक्षीस, सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र तसेच सहभागी सर्व मंडळांना प्रशस्ती पत्र दिले जाणार आहे. निवड समितीतील सदस्य शहरातील गणेश मंडळाला भेटी देऊन सर्व माहिती घेतील.तसेच गणरायाचा फोटो व व्हिडीओ शूटिंग काढले जाणार आहे. २५सप्टेंबर पासून प्रत्यक्ष मंडळात पाहणी तसेच विसर्जन मिरवणुकीचे परीक्षण केले जाईल.निवड समिती प्रमुख ललित सेता, सदस्य प्रा. दिनकर गुल्हाने, गजानन मोगरे सर , कौस्तुभ धुमाळे,स्वप्नील चिंतामणी, , निलेश राजुलवार यांची टीम स्पर्धेच्या परीक्षण हेतूने मंडळांना भेट देण्यासाठी येत असून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. आप्पाराव मैंद, उपक्रम समिती अध्यक्ष शरद मैंद, उपाध्यक्ष ॲड. भारत जाधव, सर्व संचालक मंडळ तथा सामाजिक उपक्रम समिती सदस्यांनी केले आहे. स्पर्धेतील विजेत्या मंडळांची नावे बक्षीस वितरणाचे दिवशीच जाहीर केले जाईल.
पर्यावरण पूरक मुर्त्या व देखव्यांना प्राधान्य
गणेश मंडळासाठी आयोजित या स्पर्धेमध्ये पर्यावरण पूरक मातीच्या मुर्त्या व आरास करणाऱ्या मंडळाला प्राधान्य दिले जाणार आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून “माझी वसुंधरा” या अभियानामध्ये खारीचा वाटा म्हणून मदत होईल. त्यामुळे गणेश मंडळानी पर्यावरण पूरक मुर्त्या देखाव्यांवर भर देणे अशी अपेक्षित आहे.