राजकिय

नाईक घराण्यांचे मुख्य वारसदार युवानेते ययाती नाईक उमेदवारी मागे घेणार कां.? अविनाश नाईक यांच्या भेटीनंतर विरोध क्षमणार असल्याचे चित्र! 

देव आला तरी अपक्ष उमेदवारी मागं घेणार नाही' म्हणानारे युवा नेते ययाती नाईक यांनी लढाई आधिच शस्त्र टाकल्याची चर्चा..

पुसद: विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारांनी पक्षीय उमेदवारांची चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. विधानसभेसाठी जवळपास २० अपक्ष उमेदवार निवडणुक रिंगणात असून आता अपक्षांना अर्ज माघारीसाठी साम, दामचा वापर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मनोहर नाईकांच्या घरात उभी फूट पाहायला मिळत होती. नाईकांचे दोन्ही पुत्र या विधानसभेच्या निवडणुकीत आमने-सामने भिडणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते कधी नव्हे ती या विधान सभेची निवडणूक चांगली रंगात येणार म्हणता म्हणता या निवडणुकीत व्टिस्ट आला आहे युवानेते ययाती नाईक यांना माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांचे सुपुत्र अविनाश वसंतराव नाईक यांनी मुंबईला तातडीने बोलावून त्याची समजूत काढण्यात त्यांना यश आले आहे त्यामुळे माजी मंत्री मनोहर नाईक यांचे धाकटे सपुत्र इंद्रनील नाईक यांच्यासाठी निवडणुकीचा मार्ग सुखकर झाल्याचे चित्र पाहावयास मिळत असुन नाईक घराण्याचे मुख्य वारसदार युवा नेते ययाती नाईक यांनी  अविनाश नाईक यांचा मान राखीत पुसद विधानसभा मधील उम्मेदवारी अर्ज मागे घेऊन वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा मतदार संघातील उम्मेदवारी कायम ठेवणार असल्याचे झेप न्यूजशी बोलताना सांगितले आहे.’देव आला तरी अपक्ष उमेदवारी मागं घेणार नाही’ म्हणानारे युवा नेते ययाती नाईक यांना मुंबईतून बोलावणं आलं, अविनाश नाईकसोबत चर्चा होताच ययाती नाईक यांचा यूटर्न घेतला असून पुसद मतदारसंघात लढाईच्या आधिच शस्त्र टाकले असल्याने या मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. या विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षा विरुद्ध बंड करीत धाकट्या भावाविरुद्ध रणशिंग फुंकत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यामुळे नाईक कुटुंबाला मानणारा वर्ग तसेच बंजारा समाज व्दिधा मनस्थितीत होता परंतु नाईक कुटुंबातील अनेक वाटाघाटी नंतर व चर्चाअंती युवा नेते ययाती नाईक यांनी पुसद मतदारसंघातील अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेवून कारंजा मतदार संघातील निवडणूक लढणार असल्याची घोषणा केल्याने नाईक कुटुंबातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार इंद्रनील नाईक यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. परंतु नाईक कुटुंबाची ही खेळी विरोधी गटासाठी व महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार असून ही विधानसभा निवडणूक इंद्रनील नाईक यांना  सोपी जाणार असल्याचे चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close