श्रमिकांच्या श्रमावर व घामावरच देशाची प्रगती होईलः जिल्हा न्यायाधीश व्ही. बी. कुळकर्णी

पुसद: येथील न्यायालयात तालुका विधी सेवा समिती, पुसद व वकील संघ पुसदच्या संयूक्त विद्यमाने दि.२८ मे २०२४ रोजी दुपारी २.१० वाजता कोर्ट कॅन्टीग हॉल, ज्ञानदान कार्यक्रमा अंतर्गत कायदेविषयक ज्ञानदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर ज्ञानदान कार्यक्रमाचा विषय आंतरराष्टीय कामगार दिना हा होता. कामगाराच्या विषयावर प्रास्तावीक व आभार प्रदर्शन ॲड. सविता आढाव यानी केले. या कार्यक्रमाला गोविंद एस. वर्षे साहेब, ४थे सह दिवाणी नयायाधिश क.स्तर, एन.बी. जाधव साहेब, २रे सह दिवाणी न्यायाधिश व. स्तर व्ही. एस. वाघमोडे, २रे सह दिवाणी न्यायाधिश क. स्तर, श्रीमती स्वाती जाधव मॅडम, ३रे सह दिवाणी न्यायाधिश क. स्तर यांनी सदरच्या ज्ञानदान कार्यक्रमात भाग घेतला. सदर कार्यक्रमाला गोविंद एस. वर्षे यांनी भारतात सर्व नागरिकाना समानतेची वागणुक आहे असे संबोधीत केले. श्रमीकांना कोणत्या सोयीसुविधा व अधिकार उपलब्ध आहे हे सांगीतले. तसेच त्यांना कोणत्या सुविधा पुरविल्या जावु शकतात हे सांगितले.शासनाने कोणत्या सुविधा आखलेल्या आहे यासबंधातही मार्गदर्शन केले.त्यानंतर सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व पुसद तालुका विधी सेवा समीतीचे अध्यक्ष व्ही. बी. कुळकर्णी साहेब यांनी शासनाने जाहिर श्रमीकांसाठी केलेल्या योजनाचा लाभ तसेच कामगारांना येणा-या संकटांना व असुरक्षतेला जे तोंड दयावे लागते त्यासंबधातुनच्या योग्य त्या योजना काय आहे व त्यांना सुविधा कशा मिळाल्या पाहिजे या संबंधातुन माहिती दिली त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये श्रमीकांचे शोषन होवु नये व त्यांना सन्मानपुर्वक नजरेने पाहीले पाहीजे व त्यांच्या श्रमांचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे. कामगार दिन हा श्रमीकांना सन्मान मिळणासाठी समर्पीत आहे. श्रमीकांच्या श्रमामुळेच देश उभा आहे. श्रमीकांना सन्मान दिला नाही तर आपण श्रमांचा अपमान केल्यासारखे होईल जगातील सर्वात सुंदर वास्तु ताजमहल ही श्रमीकांच्या श्रमामुळेच तयार झाली आहे. जोपर्यंत आपला समाज श्रमीकांची सभ्यता लक्षात घेता येणार नाही व त्यांना कायदेशीर त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळु देणार नाही तोपर्यत आपल्या देशााची प्रगती होणार नाही म्हणुन श्रमीक व मालक यांच्या मधील अंतर किंवा दरी कमी करुन दोघांनाही समानतेची वागणुक देण्याची गरज आहे. जगाच्या इतर देशांमध्ये श्रमीकांना अत्यंत सभ्यतेने वागविले जाते व बालवयातच शाळांमधुन व माहविदयालयातुन श्रमीकांची प्रतिष्ठा व त्यांना सभ्यता याबाबत धडे दिले जातात व त्यांना कसे वागविले पाहीजे याचे ज्ञान दिले जाते. आपल्या देशात देखील आपण अशाच पध्दतीने जनजागृती करुन श्रमीकांचे शोषण न होण्यासाठी कोणते कायदे व योजना अस्तित्वात आहेत याची माहिती सातत्याने समाजाला व तसेच श्रमीाकंना करुन देणे गरजेचे आहे. तसेच त्यांची प्रतिष्ठा राखने गरजेचे आहे. त्यांनी शेवटी असेही सांगितले की, देशाची प्रगती श्रमीकांच्या श्रमावरच अवलंबुन आहे. म्हणुन सातत्याने त्यांच्या अधिकाराचे रक्षण करणे हे आपले आदयकर्तव्य आहे. सदरहु कार्यक्रमामध्ये वकीलांनी आपली उपस्थिती मोठ्या प्रमाणात दर्शविली. त्यामध्ये ॲड. गावंडे, ॲड. मुळे, ॲड. सुचिता नरवाडे, ॲड. सुशिला नरवाडे, ॲड. श्वेता पांढरीपांडे, हे प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी श्रीमती. काळबांडे, अधिक्षक, भोयर, जाधव, भलगे, खसाळे, श्रीमती. पवार, श्रीमती. सालेगावकर, कु. बेले, जोशी, सतिश राठोड तसेच सुरक्षा रक्षक आदी उपस्थित होते.