प्रहार जनशक्ती पक्ष वणी विधानसभा आयोजित दिव्यांग मार्गदर्शन शिबीर संपन्न!

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : प्रहार जनशक्ती पक्ष वणी विधानसभा तर्फ़े दिव्यांग मार्गदर्शन शिबीर दि. २७ ऑगस्ट २०२३ ला हनुमान मंदिर अडेगाव येथे घेण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन झरी तालुकाप्रमुख संतोष सिंग सेंगर यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम भोयर यांनी केले. कार्यक्रमाला संबोधित प्रहार जनशक्ती पक्षाचे वणी शहरप्रमुख अनिकेत दादा चामाटे यांनी केले. दिव्यांग कल्याणकारी योजनेची माहिती, दिव्यांगांना मार्गदर्शन व दिव्यांग नोंदणी करण्यात आली. दिव्यांगांच्या बांधवांच्या अनेक प्रश्नांचे उत्तर देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.सीमा ताई लालसरे सरपंच (अडेगाव ग्रामपंचायत) प्रमुख अतिथि मा.श्री.आशीष भाऊ तुपटकर(युवक जिल्हाप्रमुख), मा.श्री.नितिन भाऊ गोरे(तालुकाप्रमुख वणी), प्रहार सेवक निखिल बुच्चे, संदिप बोधे, मारोती पाचभाई, अरविंद मासिरकर, प्रविण टेकाम, मोरेश्वर मलवडे, दिनेश काटकर, प्रकाश धोगळे, अरूण कोटणाके,अविनाश यवले होते. यावेळी प्रहारसेवक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.