
पुसद :- राजस्थान मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राधाकृष्ण मंदिरात अन्नकुट व दिपावली मिलन हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सकाळी ९ वा. ३० मी. पासुन लहान्यांनी वरिष्ठाचे आर्शिवाद घेतले. ११ वा. राधाकृष्ण मंदिरात राजस्थान मंडळाचे अध्यक्ष चंद्रकान्त गजबी यांचे हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पुजन व सामुहिक करण्यात आली. आरती नंतर अन्नकुट प्रसाद ला सुरवात करण्यात आली. दिवाळी निमित्य समाजातील प्रत्येकापर्यत गोड जेवण पोहवण्याच्या उदिष्टाने अन्नकुट ची परंमपरा राजस्थान मंडल राजस्थानी समाजासाठी पार पाडत आहे. पारंपारीक राजस्थानी व्यंजन अन्नकुट प्रसाद मध्ये देण्यात आले होते. ह्या कार्यक्रमा साठी समाजातील सर्वजण मदत करीत असतात.अन्नकूट स्थळी कोणताही पदार्थ व्यंजन वाया टाकु नये च्या सुचना देण्यात येत होत्या. जेणेकरून अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेण्यात आली.
अन्नकुट व दीपावली स्नेहमीलन कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेचे उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शरद मैंद व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार इंन्द्रनिल नाईक यांनी सदिच्छा भेट देऊन राजस्थान समाजातील वरीष्ठांचे आशिर्वाद घेतले.कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन्ही मुख्य पक्षाचे उमेदवार समोरासमोर भेट झाल्याने सर्वाच्या भोवय्या उचावल्या.
अन्नकुट व दिपावली मिलन कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजस्थान मंडळ चे अध्यक्ष चंद्रकान्त गजबी, सचिव अँड. विनोद कुमार पनपालिया समेत संपूर्ण राजस्थान मंडळ कार्यकारणी ने अथक परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमात संपूर्ण राजस्थानी समाज, राजस्थानी महिला मंडळ,पुसद तालुका माहेश्वरी संघटन , अग्रवाल मंडळ, राजस्थानी ब्राम्हण पंचायत, जांगिड समाज, अ. भा. मारवाडी युवा मंच शाखा पुसद चे सहयोग मिळाले.