अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई!

पुसद:येथील वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीत बस स्थानक समोर दोन इसम दुचाकीवर अवैध देशी दारूचा साठा विक्री करण्याच्या इराद्याने घेऊन जात असल्याची गोपीनिय माहिती खबऱ्याकडून स्थानिक गुन्हे शाखेला दि.६ जुलै रोजी मिळाली. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी सापळा रचून त्या दुचाकीस्वारांना अवैध देशी दारूच्या साठ्यासह त्यांच्याकडून चाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्तकरण्यात आला आहे.या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक एम एच ०२ ए एक्स २९०१ ने रोशन दिलीप जोगदंडे वय २२ वर्ष रा. भीमनगर काकडदाती व विष्णू पुंडलिक मळघणे वय ३८वर्ष रा.सरनाईक ले-आउट श्रीरामपूर हे सदर बजाज डिस्कवर कंपनीच्या मोटरसायकलवर अवैध दारू वाहतूक करीत असताना आढळून आले यांचे विरुद्ध कलम६५(ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यवतमाळ यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सांगळे पोलीस उपनिरीक्षक सागर भारस्कर पंकज पातुरकर कुणाल मुंडोकार साहिल मिर्झा मोहम्मद ताज सुनील पंडागळे दिगंबर गीते तेजाब रणखांब सुभाष जाधव यांनी सदर कारवाई पार पाडली आहे.