शेतकऱ्यांवर अस्मानी सुलतानी संकट असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या अश्रूंवर मायेची फुंकर घालण्यासाठी ना. इंद्रनील नाईक यांना वेळ नाही!
आमदारकी जनतेनेच बहाल केली परंतु अडचणीच्या काळात स्थानिक आमदारांना शेतकऱ्याचा विसर!

पुसद: मतदारसंघात एकीकडे शेतकऱ्यांच्या सन्माना निमीत्त कृषी गौरव पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे शेतकऱ्यांवर अस्मांनी सुलतानी संकट कोसळत होते मुसळधार पावासाने झोडपल्याने मतदार संघातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद मैद हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतीची पाहणी करीत होते.
परंतु ज्यांना जनतेने आमदारकी बहाल केली ते मात्र नामदार राज्यमंत्री कार्यक्रमाच्या तयारीसाठी मग्न होते. एवढी मोठी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होवुन शेतकरी अडचणीच्या काळात असताना तसेच राज्यमंत्री मतदार संघात हजर असताना सुद्धा हे स्थानिक नामदार राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधावर जाण्यासाठी वेळ मिळाला नाही किंवा त्यांच्या ठेवणीतल्या समर्थकांनी काहीच केले नाही. उलट शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तात्काळ करून अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी वेळोवेळी अनेक शेतकऱ्यांनी शरद मैंदं यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे सत्तेतील राजकीय नेता पुढे न आल्याने शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया पुढे येऊ लागले आहे.
पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा अनुभव पुसद मतदारसंघासाठी नवा नाही. कुठल्याही आपत्तीमध्ये हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक, तसेच जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांना शेतकऱ्याप्रती तळमळ होती नंतर लोकनेते मनोहरराव नाईक यांच्या पर्यंतचे नेते व त्यांचे समर्थक सुद्धा दुष्काळग्रस्तानां आधार देण्यासाठी धावून जात असत परंतु याच कुटुंबाचे वारसदार राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे सत्तेची धुरा आली तेव्हापासून तसेच ते मतदार संघातून भरघोस मताने निवडून आल्याने त्यांनी जाणीवपूर्वक मतदार संघातील जनतेशी व शेतकऱ्याप्रती दुरावा निर्माण केला आहे. एकीकडे पुसद मतदारसंघात शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ कृषी गौरव सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन सुरू होते. त्याचवेळी दुसरीकडे शेतकऱ्यावर अस्मानी सुलतानी संकटाने काळ घातला हजारो हेक्टर शेतीचे व आणि त्याच्या गोरगरिबांच्या घराचे नुकसान झाले पण राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे त्यावेळी मतदार संघात हजर असताना सुद्धा त्यांनी संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पहावयास मिळाले.
परंतु जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून नुकतेच राजकारणाच्या पटलावर पाऊल ठेवलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद मैद मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना फुल ना फुलाची पाकळी आपल्या भारती मैंद पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमातून जमेल तेवढी मदत करून प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मागणी करीत आहेत. व शेतकऱ्यांच्या अश्रूवर मायेची फुंकर घालत आहेत.पण शेतकऱ्यावर अस्मानी सुलतानी संकट कोसळले हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असतांना मात्र सत्तेत असलेले महायुतीच्या सरकारमधील राज्य मंत्र्यांनी झोपचे सोंग घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. जनता जनार्दन आहे. त्यांनी ठरवले तर राजकारणात काहीही होऊ शकते. परंतु दुसऱ्यांदा जनतेने इंद्रनील नाईक यांना आमदारकी बहाल केली व मंत्रीपदी बसविले त्यामुळे मतदारसंघात विकासकामे करीत असताना मंत्री महोदयांनी जनतेलाच केंद्रबिंदू मानून किंवा अडचणीच्या काळात जनतेसाठी धावत गेले पाहिजे जनतेसाठी नेता किंवा आमदार म्हणून नव्हे तर एक सेवक म्हणून निश्चित ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. मात्र आता जनतेला अशी अपेक्षा या नेत्यांकडून उरली नाही असेच चित्र पाहावयास मिळत आहे. कारणही तसे आहे या मतदारसंघातील जनतेने इंद्रनील नाईक यांना भरभरून प्रेम दिल्याने या नेत्यांचे पाय जमिनीवर नसल्याचे चर्चा मतदारसंघात सुरू आहे म्हणूनच शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मंत्री महोदयांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अश्रूूवर मायेची फुंकर घालायला वेळ मिळत नाही.



