ईतर

पुसद अर्बन जि.प. कर्मचारी पतसंस्थेतील नियमबाह्य कंत्राटी लिपीक भरती अखेर रद्द!

पुसद :येथील पुसद अर्बन जि. प. कर्मचारी पतसंस्था र.नं. ४०१ या पतसंस्थेचे अध्यक्ष व शाखा व्यवस्थापक यांनी आपल्या मुले व नातेवाईकांची पतसंस्थेत नियमबाह्य कंत्राटी पद्धतीने नोकर भरती केल्याची तक्रार प्रशांत फटाले, शरद देवधर व संतोष देशमुख यांनी सहाय्यक निबंधक पुसद यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. परंतु सहाय्यक निबंधक सुनील भालेराव यांनी थातूरमातूर चौकशी करून चौकशीअंती पतसंस्थेला पाठीशी घातले होते.ही भरती प्रक्रिया नियमबाह्य झाल्याने तक्रारकर्त्यानी अखेर जिल्हा उपनिबंधक यवतमाळ यांचे कडे अपील दाखल केले त्यावरून उपनिबंधक यवतमाळ नानासाहेब चव्हाण यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता त्यामध्ये पतसंस्थेच्या कारभाऱ्यांनी कंत्राटी नोकरी भरती करीत असताना कर्मचारी भरती बाबतचा विषय संचालक मंडळाच्या सभेमध्ये घेतला नसुन अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर येणा-या विषयामध्ये घेतलेला आहे. सेवानियमातील तरतुदीनुसार पात्रता धारण करणा-या उमेदवाराकडुन अर्ज मागवुन भरती प्रक्रियाराबविली नाही. उमेदवाराचे नियुक्तीबाबत लेखी – मौखिक परिक्षा घेतलेली नाही. अर्ज मागविण्याकरीता वर्तमानपत्रामध्ये जाहिरात सुद्धा दिलेली नाही. भरती प्रक्रिया राबविण्याबाबत संबंधित कार्यालयाची परवानगी घेतलेली नसल्याचे निदर्शनास आले. व जबाब नोंद केल्या नंतर सदर ही भरती प्रक्रिया नियमबाहय असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा उपनिबंधकांनी सहाय्यक निबंधक पुसद यांना पुसद अर्बन जिप कर्मचारी पतसंस्थार र न ४०१ची लिपीक पदावरील नियुक्त्या रद्द करण्या बाबत आदेश पारित करण्यात आला असून ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शाखा व्यवस्थापक यांनी स्वतः ची मुले व नातेवाईकाचा नोकर भरती राबविल्यान हे आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. या पतसंस्थेत या पूर्वी सुध्दा आवश्यकता नसतांना सभासदाच्या पैश्याचा दुरुपयोग करून स्वतःचे नातेवाईकांचाच भरणा केल्याचे निदर्शनास येताच सहाय्यक निबंधक सुनील भालेराव यांना तात्काळ कारवाई ची अंमलबजावणी करावी तसेच सदर संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे अशी मागणी तक्रारकर्त्या कडून व सभासदांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close