शैक्षणिक

महागाव तालुका पत्रकार असोसिएशनच्या वतीने NEET च्या प्रवेश प्रक्रिया परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-महागाव तालुका पत्रकार असोसिएशन यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या NEET प्रवेश प्रक्रिया परीक्षेत घवघवित यश संपादन केलेल्या महागाव तालुक्यातील गुणवत्तांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महागाव तालुका पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष तथा लोकमत वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार महागाव तालुका प्रतिनिधी

संजयजी भगत यांच्या ५५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून महागाव तालुका पत्रकार असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तथा भाजपाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ भुतडा यांची वाशिम यवतमाळ लोकसभा प्रचार प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आला होता .

महागांव तालुक्यातील पोखरी (तांडा) येथील बंजारा समाजाची कु. वैष्णवी परसराम राठोड या मुलींनी ७२० गुणांपैकी ७०० गुण संपादन करून ओबीसी प्रवर्गात ४४ वी रँक संपादन केली देशपातळीवर महागाव तालुक्याचे नाव नेल तर सवना येथील प्रशांत संजय पल्लेरवाड या विद्यार्थ्यांनी हालाखीच्या परिस्थितीत७२० पैकीकार्यक्रमाच्या ६५२ गुण संपादन केले या दोन्ही विद्यार्थ्यांचा शाल व श्रीफळ भेटवस्तू देऊन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनजी भुतडा, ज्येष्ठ पत्रकार विजय बोंम्पीलवार, महागाव तालुका पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष संजयजी भगत तथा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देवुन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयराव बोंबीलवार हे लोकमतचे प्रतिनिधी होते.

तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार गजाननजी वाघमारे यांनी केले. तर प्रमुख अतिथी विठ्ठलराव गावंडे ,जगदीश नरवाडे हे होते तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार बांधव संजय कोपरकर ,गणेश भोयर नंदकुमार कावळे, भैय्या पाईकराव, माणिक मुनेश्वर,ओमकार देशमुख, धमानंद कावळे , नरेंद्र नप्ते,पवन रावते ,संतोष जाधव ,संजय साहेबराव नरवाडे, संदीप कदम,फराज पठाण यांनी परिश्रम घेतले तर प्रमुख उपस्थित न.प.उपनगराध्यक्ष सुरेश नरवाडे पाटील,हिरासिंग चव्हाण मा.मुख्याध्यापक, विजय जाधव , प्रा.कैलास राठोड,नागेश राजनकर ,रवी वाघमारे ,रामराव गावंडे, बळीरामजी राठोड, डी.
बी .नाईक माजी सभापती पंचायत समिती, बाळूभाऊ राठोड, आडे इत्यादी व विद्यार्थ्यांचे पालक आई-वडील तथा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close