आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत केदार जगताप विदर्भात अव्वल!

पुसद ता. १७ विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपुर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या खैरागड चषक आंतरजिल्हा स्पर्धेत स्थानिकचा केदार कैलास जगताप हा अकरा जिल्ह्यातील संघात सर्वाधीक रन काढणारा खेळाडू ठरला आहे.
या दोन दिवशीय साखळी चषकाचा अंतीम सामना ता.१६ ला गोंदिया येथे भंडारा विरुध्द यवतमाळ संघात झाला. या सामन्यात सलामीवीर केदार जगतापने पहिल्या इंनिगमध्ये १०८ धावा तर दुसऱ्या इंनिंगमध्ये ८० धावा काढल्या. तसेच याच चषकात वाशिम संघाविरुध्द त्याने द्वीशतक झळकावले होते. एकूण सामन्यात त्याने सर्वाधीक ७३ चौकारासह सर्वाधीक ४७९ धावा काढून तो अव्वल स्थानावर आहे. फलंदाजी सोबतच गोलंदाजी करतांना त्याने चषकात ८ विकेट प्राप्त केल्या. यवतमाळ, बुलढाणा, अकोला, आमरावती व वाशिम हे संघ अ गटात होते तर ब गटात भंडारा, वर्धा, गोंदिया, नागपुर, चंद्रपूर व गडचिरोली संघाचा समावेश होता. चॕम्पीयन ठरलेल्या यवतमाळ संघाला कोच दीपक जोशी यवतमाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
पुसदचा अमन खानही यवतमाळ संघात.
पुसद : यवतमाळ संघामध्ये स्थानिकचा अमन ईकबाल खान याचाही समावेश असून अमनने१२ जूनला वर्ध्या विरुध्द झालेल्या सामन्यात १२ चौकार व ५ षटकारासह ११३ रनची खेळी केली होती. येथील गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूलच्या शिक्षिका बिलकीस मॕडम यांचा तो मुलगा आहे.