लॉयन्स क्लबचा स्तुत्य उपक्रम;दत्तक पारडी गावात नेत्र व महिला आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..◆नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पुसद : लॉयन्स क्लबचे बोर्ड ऑफ मेम्बर पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांचे मार्गदर्शनात स्थानिक लॉयन्स क्लब ऑफ पुसद सिटीद्वारा सेवा सप्ताहाचा उपक्रम म्हणून पारडी गावात नेत्र व महिला आरोग्य तपासणी शिबिर दि.१७ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतच्या सभागृहात पार पडले. तालुक्यातील पारडी गाव हे शरद मैंद यांचे संकल्पनेतून लॉयन्स क्लबने दत्तक घेतले आहे. लॉयन्स क्लबच्या सामाजिक उपक्रमांचा फायदा पारडी येथील नागरिकांना व्हावा या उदात्त हेतूने तेथे विविध उपक्रम राबविले जातात.
यावेळी झोनल चेअर पर्सन तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. जय भोपी यांनी नेत्र रुग्णांची तपासणी केली, डॉ. सौ.सुहासिनी जय भोपी यांनी महिलांच्या नानाविध आजारांची तपासणी केली तर डॉ.मिलिंद तगलपल्लेवार यांनी बदलत्या ऋतूंमुळे नाक,कान व घसा संबंधित आजारांवर उपचार केले. तसेच डॉ दुर्गेश गौतम यांनी सुद्धा हिमोग्लोबिन संबंधित तपासण्या केल्या. संपूर्ण शिबिरात सर्व रुग्णांना औषध,टॉनिक, व्हिटॅमिन युक्त गोळ्या, डोळ्यांसंबंधी ड्रॉप, शुगर संबंधित गोळ्याऔषधी मोफत वितरित करण्यात आली हे विशेष.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर लॉयन्स क्लबचे झोनल पर्सन डॉ.जय भोपी,अध्यक्ष संदीप जिल्हेवार, डॉ.मिलिंद तगलपल्लेवार , डॉ दुर्गेश गौतम, पारडी येथील सरपंच सौ.मनीषा पांडे, उपसरपंच पृथ्वीराज चव्हाण,ग्रामसेवक विजय इसळकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक अध्यक्ष संदीप जिल्हेवार यांनी केले तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मनिष आनंतवार यांनी मानले.
सदर उपक्रमाचे प्रोजेक्ट डायरेक्ट डॉ.मिलिंद तगलपल्लेवार , डॉ दुर्गेश गौतम, अभिजित पानपट्टे, राजेश विश्वकर्मा, सतिष जयस्वाल हे होते.तर शिबिराच्या यशस्वीते करिता पारडी येथील लॉयन्स क्लबचे सहकारी मनोज जाधव, लॉयन्स प्रविर व्यवहारे, ऍड.मनोज घाडगे, ऍड.शिवाजी खराटे, यशवंतराव चौधरी, मिलिंद राठोड,अमोल व्हडगिरे, संग्राम देशमुख यांनी परिश्रम घेतले.



