श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ दहावीचा निकाल शंभर टक्के

पुसद : श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ ता.पुसद शाळेचा दहावीचा निकाल १०० % लागला असुन सर्व विद्यार्थ्यांचे पास झाल्याबद्दल अभिनंदन शाळेचे मुख्याद्यापक श्री.गोपाल एम.चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले , कु शितल सोंगे ही 84 % घेऊन उत्तीर्ण झाली तर चि. शुभम असोले 83 % घेऊन उत्तीर्ण झाला तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी कडून शुभेच्छा देण्यात आले.विद्यार्थीचे नियमीत तासिका, विद्यार्थी उपस्थिती ,अभ्यासाचे शैक्षणिक नियोजन ,मार्गदर्शन तसेच दर शनिवारी विविध विषयाच्या टेस्ट त्यामुळे हा निकाल लागला ,ग्रामीण भाग असुनही सर्व शिक्षकवृंद यांच्या सहकार्याने हे शक्य झाले असे मुख्याद्यापक यांनी सांगितले.ग्रामीण भागातही शैक्षणिक गुणवत्ता कायम आहे त्यासाठी शाळेचे अध्यक्ष श्री पंकज चव्हाण यांनी शाळेच्या मुख्याद्यापक व शिक्षकवृंद यांचे अभिनंदन केले.