राजकिय

अश्विन भैया जैयस्वाल यांची भाजपला सोडचिठ्ठी;पुसद मतदारसंघात विधानसभेला मनसेतर्फे निवडणुक रिंगणात उतरणार!

पुसद विधानसभा मतदारसंघातील जनतेसमोर नवा पर्याय!

पुसद:गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे पदाधिकारी असलेले अश्विनभैया रमेशलाल जैयस्वाल यांनी नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करीत पुसद विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी पदरात पाडून घेतली आहेअशातच सर्वांचं लक्ष लागलं आहे ते पुसद विधानसभा मतदार संघाकडे या मतदारसंघात प्रस्थापिताने  आजपर्यंत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे परंतु यावर्षी प्रस्थापित नाईक घराण्याला ही निवडणूक सोपी नसल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. माहितीने या मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला आहे तर एकीकडे महाविकास आघाडीने अजूनही उमेदवारी जाहीर केली नाही तर या मतदार संघाच्या निवडणुक रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुसद येथील हिंदुत्ववादी चेहरा म्हणून अश्विन भैया जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली आहे.पुसद विधानसभा मतदार संघामध्ये नव्यानेच मनसेमध्ये प्रवेश घेतल्याने अश्विन भैया जयस्वाल यांनी मोर्चे बांधण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे या मोर्चेबांधणीमुळे जनतेसमोर नवा पर्याय उभा राहून प्रस्थापितांसमोर ते तगडे आव्हान निर्माण करू शकतात अशी चर्चा मतदारसंघा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असुन सर्व राजकीय पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करीत आहेत.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार करून सत्तेमध्ये जाण्याचा राजमार्ग निर्माण केला आहे. देशातील राजकीय पक्षांपैकी मनसे हा एकमेव विकासाची ब्ल्यू प्रिंट मांडणारा पक्ष असून राज्याच्या विकासाचे व्हिजन आणि कृती आराखडा जनतेसमोर सादर सुद्धा करण्यात आला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मनसेला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी प्रखर हिंदुत्ववादी मतांची प्रतारणा केल्याचा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला. याचा धागा पकडत राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारल्याने राज्यातील अनेक हिंदुत्ववादी विचारसरणीचे युवक त्यांच्या पक्षात सामील होत आहे.यामध्ये पुसद येथील भाजप चे पदाधिकारी अश्विन भैया जयस्वाल यांनी सुध्दा मनसे मध्ये दि१३ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे जाहीर प्रवेश करून पुसद विधानसभा निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असुन त्यांना राज ठाकरेंनी मनसेची उमेदवारीही जाहीर केली आहे. अश्विन भैया जयस्वाल यांचा पुसद तालुक्यातील दांडगा जनसंपर्क असुन त्यांनी मागील पुसद नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी आपल्या सुविधपत्नीला यांना भाजपच्या तिकिटावर उमेदवारीवर मीळवुन निवडणुक लढविण्यास उतरविले होते यामध्ये त्यांचा अल्प मताने निसटता पराभव झाला. त्यानंतरही त्यांनी आपला जनसंपर्क व समाज सेवेचे कार्य सुरूच ठेवले.अश्विनभैया जयस्वाल यांनी पुसद विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली असुन त्यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अश्विन भैया जयस्वाल यांच्यासारखा तुल्यबळ हिंदुत्ववादी चेहरा रिंगणात उतरल्याने महायुतीच्या उमेदवारासमोर त्यांचे कडवे आव्हान असणार आहे. या मतदारसंघात प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आश्विन भैया जयस्वाल यांनी कंबर कसली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close