माऊंट लिट्रा झी स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल

पुसद :येथील माऊंट लिट्रा झी स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल लागला, एकूण २७ विध्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ५ विध्यार्थी ९०% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेत, तर प्रावीन्य सह २० विध्यार्थी उत्तीर्ण झालेत, कु.श्रावणी पुलाते व यश तगडपल्लेवार हे ९४% व ९३.६०% गुण घेऊन अव्व्ल आलेत, सदर शाळा पुसद शहरातील नामांकीत शाळा असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा दूरदृष्टीकोन सर्व संचालक मंडळानी ठेऊन अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.तसेच सदर शाळेचे विद्यार्थी अनेक क्षेत्रात नेत्रदिपक यश मिळवीत आहेत .दहावीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे सर्व संचालक मंडळांनी केले.तसेच शाळेचे मुख्याध्यापक शाळा समन्वयक , प्रशासन अधिकारी क्रिडा प्रशिक्षक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.



