“तुमची लेक व बहिण समजून मला निवडून द्या” -सौ.राजश्री पाटील यांचे माहायुतीच्या मेळाव्यात मतदारांना भावनिक आवाहन!
माहायुतीच्या मेळाव्याला भावनाताई गवळी यांची दांडी!

पुसद : वाशिम- यवतमाळ लोकसभेतील पुसद विधानसभा मतदारसंघाची वेगळी ओळख आहे. या मतदारसंघाने जिल्ह्याचे नव्हेतर महाराष्ट्रालाचे नेतृत्व केले. महाराष्ट्राला नव्हेतर देशाला दिशा देण्याचे काम केले. अशा या मतदारसंघाची वेगळी ओळख आहे.तर या पुसद विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने दि. ९ एप्रिल २०२४ रोजी अग्रवाल मंगल कार्यालयात पुसद तालुका महायुती बूथ प्रमुख गटप्रमुख कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माहायुतीच्या शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ.राजश्री हेमंत पाटील यांनी त्यांनी मतदारांना भावनिक आव्हान केले.माझे सासर नांदेड असले तरीही मी यवतमाळ जिल्ह्याची मुलगी आहे.या भागाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी मी प्रयत्न करेन. एक तुमची लेक व बहिण समजुन मला आशिर्वाद द्या.मी तुम्हाला दिलेल्या आश्वासनाला तडा जाऊ देणार नाही असे आश्वासन आपल्या भाषणात महायुतीच्या उमेदवार सौ. राजश्री हेमंत पाटील यांनी याप्रसंगी दिले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी विरोधकांवर टीका केली. माजी मुख्यमंत्री नाईक साहेबांचे हिरवे स्वप्न साकार करण्यासाठी साखर कारखाना उभा केला. तो बंद असलेला कारखाना खा. हेमंत पाटील यांनी सुरु केला. आज तो कारखाना शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरला आहे. केंद्रातील वेगवेगळ्या योजना आपल्या पर्यंत पोहचविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असे सांगुन त्यांनी जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न, माळपठारावरील लिप्ट एरिगेशनचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेन माजीमंत्री मनोहरराव नाईक यांचा मला आशिर्वाद आहे. यवतमाळ जिल्हा माझे माहेर आहे. परकेपणा वाटत नाही. काही लोकांनी मी नांदेडची म्हणुन अपप्रचार सुरू केला.तुमच्या मुलीचा अपमान तुम्ही सहन करणार काय..? असा प्रश्न उपस्थित करुन त्यावेळी मतदारांना त्यांनी भावनिक साद घातली. घराघरातील भावंडांचा मला आशिर्वाद मिळेलच. गोदावरी अर्बन सोसायटीच्या माध्यमातून १०० च्या वर शाखा उभ्या करुन लोकांना मदत केली व या भागात उद्योग व्हावे यासाठी चालना दिली. माझी जन्मभूमी कर्मभूमी समजुन ऋण फेडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.एक काठ सासर तर एक काठ माहेर असल्याने मला विजयाची खात्री आहे अशा त्या म्हणाल्या. याप्रसंगी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामाचा उल्लेख करुन नरेंद्र मोदी यांनी देशाचं रक्षण करण्याऱ्यांना सीमेवर जवान सक्षम बनविण्यासाठी त्यांना गोळीबार करण्याचे अधिकार दिले. राममंदिर उभारून हिंदू धर्माचे मान उंचावण्याचे काम केले आहे. येत्या २६ एप्रिलला धनुष्यबाणा समोरील बटण दाबुन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी सर्वश्री भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद जिल्हेवार, डॉ. सौ. आरतीताई फुपाटे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जैनुल सिद्दीकी, ॲड. जीवनराव पाटील, गुणवंत पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ॲड. उमाकांत पापीनवार, सौ. मोहिनी इंद्रनिल नाईक, भाजपाचे पुसद जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे, दीपक परिहार, रिपाई (आठवले गटाचे शहराध्यक्ष लक्ष्मण कांबळे संतोष आर्य यांनी देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा होण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सौ. राजश्री पाटील यांना निवडून द्यावे असे आवाहन केले. तर पुसद विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त मताधिक्याने निवडून देणार असल्याचे लोकनियुक्त आमदार इंद्रनिल नाईक यांनी सांगितले महायुतीचा उमेदवार देण्यासाठी थोडा वेळ लागला. परंतु राजश्री पाटील यांच्या रुपाने एक सक्षम महिला उमेदवार आपल्याला लाभला असुन उच्च शिक्षित शिक्षण व सहकार क्षेत्रात नावारुपास आलेल्या सौ. राजश्री पाटील यांना सर्वात जास्त पुसद मधुन मताधिक्य देण्यासाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी तन- मन-धनाने काम कराव असे आवाहन केले .
विधान परिषद सदस्य आमदार ॲड. निलय नाईक : महायुतीच्या उमेदवार एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. सर्वच क्षेत्रात त्यांनी नावलौकिक कमाविलेले आहे. पुसदच्या मातीमध्ये त्यांना निवडुन आणण्याची ताकद आहे. दिलेला शब्द आम्ही पाळणार असुन सर्वांनी त्यांना लोकसभेत पाठविण्यासाठी मेहनत घ्यावी असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, नाईक घराण्यातील माजी मंत्री मनोहरराव नाईक हे ज्यांना आशिर्वाद देतील तो उमेदवार निश्चितपणे निवडून येतो. यावेळी बोलताना त्यांनी ययाती नाईक यांना टोला लगावला आहे. नेट प्रॅक्टीसमध्ये असतानांच काहीजण झोपडीत बसुन ४० हजार मताधिक्य देऊ असे गणित लावत आहेत. ज्यांच्या ताब्यात एकही ग्राम पंचायत नाही त्यांची वल्गना हवेतच विरगळणार. आम्ही आता बॅटींग सुरु केली आहे. जास्तीच्या धावा काढुन आम्ही सौ. राजश्री पाटील यांना निवडून देऊ असे आश्वासन दिले आहे.भावनाताई गवळी यांनी २५ वर्ष यवतमाळ-वाशिम लोकसभेचे नेतृत्व केले. परंतु महायुतीमध्ये त्यांना तिकीट मिळाले नाही. एकनाथ शिंदे यांनी परिस्थिती पाहून निर्णय घेतला. भावना गवळी यांनी जिल्ह्याचे अनेक प्रश्न सोडविले आहेत. लवकरच त्या राजश्री पाटीलांच्या प्रचारात उतरतील. या देशाला नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही. देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यासाठी अब की बार ४०० पार चा नारा बुलंद करण्यासाठी राजश्री पाटील यांना निवडुन द्यावे असे आवाहन केले.
पालकमंत्री संजय राठोड : महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एक सक्षम उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आणि यवतमाळ जिल्ह्यातील सारंगपूर येथील माहेर असलेले महल्ले कुटुंबातील सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या राजश्री पाटील यांनाउमेदवारी दिली. त्या सक्षम उमेदवार ठरणार. शिक्षण, सहकारक्षेत्रात उत्तमरित्या त्यांनी काम केले आहे. त्यांना निवडुन
आणण्यासाठी सर्वांनी जीवाचे रानं करावे असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. ते पुढे म्हणाले, या मतदार संघात २४ गावे आहेत.
खासदाराला वर्षाला केवळ ५ कोटी निधी मिळतो. त्यामुळे विकास होत नाही. परंतु सत्ताधारी खासदार असला की हजारो कोटींचे प्रकल्प उभे राहू शकतात. येत्या २६ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा
पंतप्रधान बनविण्यासाठी धनुष्यबाण समोरील बटण दाबुन प्रचंड मतांनी निवडुन द्यावे असे आवाहन केले.याप्रसंगी माजी खा. हेमंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेतकरी कारखानदार झाला पाहिजे असे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते.त्यांनी या भागाचा विकास व्हाव म्हणुन पोफाळी वसंत साखर कारखाना सुरु केला. परंतु तो मागील दहा वर्षापासून बंद होता. शेतकऱ्यांचे हितडोळ्यासमोर ठेऊन तो साखर कारखाना सुरु केला. आज शेतकऱ्यांना २६०० रुपये भाव त्यांना मिळत आहे. उमरखेड -महागांव तालुक्यात धरणाचे पाणी मिळावे म्हणुन ६० बंधारे बांधण्यासाठी निधी खेचून आणला.पुढे राहिलेली कामे करण्यासाठी राजश्री पाटील यांना निवडून द्यावे असे आवाहन खा. हेमंत पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ओमप्रकाश शिंदे व प्रा. संजय चव्हाण यांनी केले.तर याप्रसंगी व्यासपीठावर सर्वश्री बी.जी. सर राठोड, विजय जाधव,ताहेरखान पठाण, महेश नाईक, रवि ग्यानचंदानी, भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रभारी नितीन भुतडा, राकाँजिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, निलेश पेन्शनवार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजन मुखरे, सदबाराव मोहटे, लक्ष्मणराव आगाशे, श्रीराम पवार,निखिल चिद्दरवार, अनिरुध्द पाटीलचोंढीकर, अमेय नाईक, निळकंठ पाटील, विश्वास भवरे, महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इत्यादी मान्यवरांची उपस्थित होतो. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला माजी खासदार भावनााताई गवळी यांची अनुुुुउपस्थिती होती तर बॅनरवर ही भावनाताईचा फोटो नसल्यााने मतदारामध्ये धुसफूस सुरू होती.



