पुसद शहरातील स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शिवजयंतीचा विसर! शिवप्रेमीत तीव्र नाराजी!

पुसद : शिवजयंती आली की शहर घोषणांनी दुमदुमते, व्यासपीठांवरून शिवचरित्राचा गजर होतो, फिती कापल्या जातात, पुष्पहारांनी पुतळे नटतात आणि सामाजिक माध्यमांवर छायाचित्रांचा वर्षाव होतो मात्र काहीचा उत्साह विरतो तसाच शहरात स्थानिक भाजपने महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पारंपरिक स्वागत मंच उभारला नसल्याने शिवप्रेमीध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.गत अनेक वर्षांपासून सुभाषचंद्र बोस चौकात महामानवांच्या जयंतीनिमित्त कींवा गणेशोत्सव व दुर्गोत्सवाच्या शोभायात्रेच्या स्वागतासाठी भाजपच्या वतीने भव्यदिव्य मंच उभारण्याची परंपरा आहे.या मंचाच्या माध्यमातून पक्षाचे विविध नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहून शोभायात्रींचे स्वागत करत असत पक्षध्वज, ध्वनिक्षेपक, उद्बोधक बॅनर, पाणी व्यवस्था, शिल्ड-शाल, गुलाल, उधळून भंडारा आदींची यथोचित व्यवस्था केली जात होती मात्र यंदा १९ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात असा भाजपच्या वतीने कोणताही मंच उभारला नसल्याने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना विसर पडला की काय असा प्रश्न सर्वसामान्य शिवप्रेमी उपस्थित करीत आहेत.तर या पक्षातील गटातटामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंतीचा या पक्षांतील अनेक स्थानिक नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना एकत्रितरीत्या या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे “ही परंपरा स्थानिक भाजपने खंडित केली कां? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर या शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.? नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर स्थानिक पक्षातही अंतर्गत बदलांमुळे हा गोंधळ झाल्याची चर्चा शहरातील चौकाचौकात सुरू झाली आहे. यापूर्वी भाजपाचे माजी आमदार ॲड .निलयभाऊ नाईक हे आशा सण उत्सव सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची आर्थिक व संघटनात्मक जबाबदारी पार पाडत असल्याचे बोलल्या जात आहे मात्र यावर्षी त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी अराम सांगितल्याने ते या कार्यक्रमाला सक्रिय राहू शकले नाहीत.तर दुसरीकडे भाजपाचे शहराध्यक्ष निलेश पेन्शनवार यांनी “परवानगी इतरांनी आधी घेतली होती” असे धादांत खोटे स्पष्टीकरण दिल्याचे समजते. मात्र पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी हे कारण फेटाळून लावले असून, दरवर्षी एक महिना आधी परवानगी घेतली जात असल्याचा दावा केला जात आहे.त्यामुळे शिवप्रेमींची स्थानिक भाजप बदल तीव्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्थानिक भाजप शहरात राजकारण करते पणशिवजयंतीसारखा महत्त्वाचा दिवस स्थानिक भाजपाचे पदाधिकारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात हे मात्र शिवप्रेमींत पटत नाही.“ज्यांच्या पराक्रमामुळे आपण हिंदू म्हणून अभिमानाने उभे आहोत, त्या राजांच्या जयंतीकडे दुर्लक्ष हे पुसद भाजपचे अक्षम्य कृत्य आहे ,” अशी भावना व्यक्त होत आहे.काही कार्यकर्त्यांनी मते, “जर शिवजयंती स्थानिक भाजपा साजरी करत नसेल, तर पुढे येणाऱ्या महामानवाच्या जयंत्या किंवा इतर उत्सवालाही बगल देऊ शकतात त्यामुळे या प्रकरणाची भाजपाच्या वरिष्ठ नेत्याकडून जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाईची मागणी खुद भाजपच्या कार्यकर्त्याकडून केली जात आहे.
“आधी लगीन कोंढाण्याचे, नंतर रायबाचे” हा शिवपरंपरेचा जप राखणाऱ्या शिवप्रेमींच्या भावना कदाचित भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विसर पडला आहे.
पुसद शहरात या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, स्थानिक भाजपच्या पक्षांमध्ये हिंदुत्व का आवाज उठविणारे छोटे-मोठे विविध गट झाले ते आपआपला या कार्यक्रमा निमित्ताने दिसून आले आहेत. भाजप स्थानिक पक्षातील जुने-नवे अनेक पदाधिकारी स्वतंत्रपणे आपली वेगळी चुल मांडतांना दिसून येत आहेत. तर उर्वरित पक्षातील सर्व भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी यांनी यापुढे पक्षाचे कसे काम करावे असा कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुसदशहरात व तालुक्यात भारतीय जनता पक्षाला ‘अच्छे दिन येणार असल्याचे दिवास्वप्न आहे.या मतदसंघात भारतीय जनता पक्षाला चांगले नेतृत्व मीळाले नाही तर आगामी काळात जिल्हा परिषद भाजपची आहे तीही शक्ती जिरवली जाईल हे मात्र सुर्य प्रकाशा एवढे सत्य आहे.अशी स्थानिक भाजपच्या सुत्रांनी सांगितले आहे.



