क्राइम

वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पार्डी येथे २ लाख९१ हजाराचा गुटखा जप्त!

पुसद: येथील वसंत नगर पोलीस स्टेशनचे हद्दीतील पार्डी गावात दि.१९ फेब्रुवारी २०२४ च्या रात्री १: ००वाजण्याच्या सुमारास वाहनातून प्रतिबंधित असलेला तंबाखू व पान मसाला घेऊन घेऊन जाणाऱ्या दोघांजणाजवळुन पोलिसांनी २लाख ९१ हजार ८३० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले असून वसंत नगर पोलीसांनी दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजी दोन्ही आरोपीला अटक करून पुसद न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, वसनगर पोलिसातअन्न व औषध प्रशासन अधिकारी अमित कुमार अशोक कुमार उपलप वय ५० वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राज्य शासनाने गुटखा विक्री बंदी घालण्यात आलेला अवैधरित्या सुगंधित पान मसाला गुटखा विक्री करणारा पार्डी येथील रहिवाशी अमोल पांडुरंग सुरोशे वय ३३ वर्षे याच्यासह त्याच्या एका साथीदाराविरोधात दि.२० फेब्रुवारी २०२४ चे रोजीच्या रात्री चौकशी अंती ८.५३ वाजता विविध कलमान्वे गुन्हे नोंद करण्यात आले आहे. आरोपी हा घटनेच्या दिवशी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात शासनाने बंदी केलेल्या सुगंधित तंबाखू जन्य पदार्थचा साठा घेऊन जात असल्याची माहिती वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर पंत व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण वारुळकर यांना गोपीने माहिती मिळाली असता त्या माहितीच्या आधारे वसंत नगर पोलीसांच्या कर्मचारी पथकाने स्टेशनच्या हद्दीतील पार्डी येथे रात्री १:०० वाजण्याच्या सुमारास सापळा रचून वाहन थांबून झडती घेतली असता त्या झडतीमध्ये २ लाख ९१ हजार ८३० रुपयाचा अवैधरीत्या व विनापरवाना सुगंधीत तंबाखू गुटखा वाहतूक करताना आढळून आला असून आरोपी विरुद्ध कलमान्वये पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर प्रकरणाचा अधिक तपास वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close