पहिल्याच वर्षी पोदार लर्ण स्कूल पुसदचा १००%निकाल!

पुसद: शहरातील परिसरात अल्पावधीतच नावलौकिकास आलेली व शैक्षणिक क्रांती घडवून आणणारी पोदार लर्ण स्कूलचा CBSE दहावी बोर्ड च्या पहिल्या बॅचचा निकाल नुकताच घोषित झाला. कृतीयुक्त सहभागावर आधारित असलेला पोदार स्कुलचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारा आहे. मानसिक, बौद्धिक, शारीरिक आणि शैक्षणिक विकास हेच या अभ्यासक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे. विविध क्षेत्राप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे. ९६ % गुणासह शाळेतून प्रथम येण्याचा मान अनिरुद्ध अविनाश आडे यांना मिळाला आहे. द्वितीय अयुष्मा अमित बोजेवार ९५.८%तसेच तिला मराठी व सामाजिक शास्त्र या विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त झाले आहे व तृतीय अर्जुन संदीप देवसरकर ९५ % हे विद्यार्थी आले आहेत तसेच संस्कृती राठोड या विद्यार्थिनीला सुद्धा मराठी विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त झाले आहेत.शाळेचा एकूण निकाल १००% लागला असून पहिल्याच वर्षी शाळेतील एकूण ४५ विद्यार्थ्यांपैकी ९०% च्या वर गुण घेऊन १० विद्यार्थी ८०% च्या वर एकूण २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे त्यांच्या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे संचालक शरद मैंद, सुरज डुबेवार, संतोष अग्रवाल, मनिष अनंतवार, संगमनाथ सोमावार तसेच प्राचार्य अनुपमा भट- देशमुख, उपप्राचार्य प्रतिमा जाधव, हेडमिस्ट्रेस विजया त्रीपाठी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर गोविंद निमडगे व सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.



