ईतरसामाजिक

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९७ वि जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

पुसद:महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांची जयंती दरवर्षी ११ एप्रिल रोजी साजरी केली जाते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी महाराष्ट्रातील सातारा येथे एका माळी कुटुंबात झाला होता. मात्र, नंतर त्यांचे कुटुंब पुण्यात आले आणि फुलांशी संबंधित व्यवसाय करू लागले, म्हणून त्यांना ‘फुले’ हे आडनाव मिळाले. ज्योतिराव फुले यांना ‘ज्योतिबा फुले‘ म्हणूनही ओळखले जाते. समाजातील वंचित आणि अनुसूचित लोकांसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन, १८८८मध्ये मुंबईत एका विशाल जाहीर सभेत त्या काळातील प्रख्यात समाजसेवक राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी त्यांना ‘महात्मा’ ही पदवी दिली. तेव्हापासून त्यांच्या नावात महात्मा जोडले जाऊ लागले भारतातील समाजसुधारक, विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते म्हणून महात्मा फुले यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी ‘सत्यशोधक समाज’ या संघटनेची स्थापना केली होती, ज्याचा उद्देश समाजातील तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी काम करणे हा होता देशात पहिली मुलींची पहिली शाळा सुरू करुन स्त्री शिक्षणाचा भारतात पाया रचला  त्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू करून स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुले केली. महात्मा फुलेंनी समाज सुधारणेसाठी महत्त्वाचं कार्य केलं. अशा या महामानवाची१९७ वी जयंती मोठ्या उत्साहात महात्मा ज्योतिबा फुले पूर्णाकृती पुुुतळ्या  शहरातील विविध संघटना,संस्थांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्या जवळ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व जयजयकाराच्या घोषणाही देण्यात आल्या. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सौंदर्यीकरण सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष विठ्ठल खडसे,सचिव लक्ष्मण कांबळे, कोषाध्यक्ष अशोक भालेराव, उपाध्यक्ष राजेंद्र नाईक ,दिनेश खांडेकर, सहसचिव अंबादास वानखडे,मुनेश्वर हाटे सहकोषाध्यक्ष दिनेश सावळे, संघटक विशाल कांबळे, संतोष आंबोरे,नितेश खंदारे,भास्कर बनसोड,विशाल पडघने, संत सावता माळी पतसंस्थचे अध्यक्ष आत्माराम जाधव, ॲड.चंद्रकांत शामसुंदर, मुरलीधर जाधव, संजय भोने, प्रकाश गोरे, राजू मोरे ,किसनराव जाधव, सौ वर्षा जाधव,वंदना कदम,सौ.संध्या गिरे,सुनील गिरे, संजय गवळी,सौ.अर्चना गवळी प्रा.विष्णू गवळी,प्रा.कल्याण साखरकर,दिपक भवरे, प्रज्ञापर्व समितीचे उपाध्यक्ष ल.पू. कांबळे सहकोषाध्यक्ष राहुल पाईकराव, इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close