विशाळगडावर झालेल्या घटने संदर्भाने; पुसद शहरात पोलिसांचा ‘रुट मार्च’

पुसद: शहर व वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि.१९जुलै २०२४ रोजी १७/१५ते१८/२० वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर येथील विशाल गडावर झालेल्या घटने संबंधांने पोलिसांकडून शहरात शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
त्या अनुषंगाने मा.सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी साहेब पुसद यांचा मार्गदर्शनाखाली पुसद शहरातील तहसील चौक,महात्मा गांधी चौक, आझाद चौक,बालाजी चौक,गुजरी चौक ,देवकृपा चौक,नगिना चौक,कापड लाईन ,नेताजी सुभाषचंद्र बोस चौक , छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवाजी विद्यालय, वसंतनगर, मौलाना अब्दुल कलाम आझाद मार्ग, टिपू सुलतान चौक, रहेमानिया मस्जिद,दुर्गा चौक, बस स्टॅन्ड चौक,मोहम्मद मस्जिद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी शांतता राखण्याचे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.
सदर रूट मार्चमध्ये पुसद उपविभागातील १० पोलीस अधिकारी, ६७ पोलीस अंमलदार, आरसीपी पथक व ६० होमगार्ड असे एकूण रुट मार्च’मध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गर्दी तसेच महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच संवेदनशील भागातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवता शहरातील नागरिकांनी शांतता राखावी, तसेच कायद्याचे पालन करावे. संशयास्पद काही आढळल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा असे आव्हान शहर पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.



