लोखंडी पुलाखाली गांजा तस्कराला मुद्देमालासह अटक;स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची मोठी कारवाई!

पुसद: शहरातील वाशिम रस्त्यावरील लोखंडी पुलाखाली गांजा घेऊन येणाऱ्या तस्कराला दि.१७ ऑक्टोंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने मुद्देमालासह अटक करण्यात आली याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की. वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाशिम रस्त्यावरील लोखंडी पुलाखाली स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकास गुप्त माहिती मिळाली की, बाहेर जिल्ह्यातून गांजा तस्कर पुसद शहरात विक्री करिता खेप घेऊन येत आहे.
त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करून पुसद शहरातील वाशिम रोड वरील लोखंडी पुलाखाली सापळा रचला असता छत्रपती संभाजीनगर येथील आरोपी सुशील सुभाष शिनगारे वय १९ वर्ष रा.पिशोर ता.कन्नड जि. संभाजीनगर याला तात्काळ ताब्यात घेऊन तो तस्करी करीत असलेल्या ८१३ ग्रॅम गांजा मोबाईल फोन तसेच इतर साहित्य सह एकूण किंमत २७,७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपीवर अमली पदार्थ औषधी व मना प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलमान्वये वसंत नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ही अवैध धंदे शस्त्र बाळगणाऱ्या व इत्यादी गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधी द्रव्याची तस्करीचे उच्चाटन करण्यास प्रतिबद्ध असून यापुढे यासंबंधी माहिती असल्यास पोलिसांची कोणती भीती न बाळगता सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.सदरची ही कारवाई जिल्हापोलीस अधिक्षक डॉ.पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ चे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने सपोनि गजानन गजभारे,सपोनी अमोल सांगळे ,पोलीस उपनिरीक्षक रेवण जागृत, पंकज पातुरकर कुणाल मुंडोकार, तेजाब रणखांब सुनील पंडागळे सुभाष जाधव दिगंबर गीते सर्व स्थानिक गुन्हे शाखा पुसद यांनी पार पाडली आहे.