राजकिय

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची धगधगती ‘मशाल’ पेटली; संजय देशमुख यांचा भरघोस मतांनी विजयी!

पुसद : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार संजय देशमुख हे ९४ हजार ४७३ इतक्या प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले. ३० व्या अंतिम फेरीअखेर त्यांना पाच लाख ९४ हजार ८०७ इतकी मते मिळाली, तर महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांना पाच लाख ३३४ इतकी मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी विजयाचे प्रमाणपत्र देत संजय देशमुख विजयी घोषित केले.मतदारसंघात एकूण १७ उमेदवार रिंगणात होते. तिसऱ्या क्रमांकाची ५६ हजार ३९० मते समनक पार्टीचे उमेदवार अनिल राठोड यांना मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या उमदेवाराचा अर्ज तांत्रिक त्रुटीमुळे बाद झाल्यानंतर अनिल राठोड यांना वंचित बहुजन आघाडीने पाठींबा जाहीर केला होता. त्याचा फायदा अनिल राठोड यांना झाल्याचे निकालातून दिसून येते. चौथ्या क्रमांकाची १७ हजार ३९६ मते बसपाचे उमदेवार हरिभाऊ राठोड यांनी घेतली. हरिभाऊ राठोड यांनी यापूर्वी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र यावेळी त्यांना स्वत:चे डिपॉझिटही वाचवता आलेले नाही. याशिवाय अमोल कोमावार, उत्तम इंगोले, धर्मा ठाकूर, डॉ. अरूणकुमार राठोड, प्रा. किसन अंबुरे, गोकुल चव्हाण, दीक्षांत सवाईकर, नूर अली मेहबूब अली शहा, मनोज गेडाम, रामदास घोडाम, विनोद नंदागवळी, संगीता चव्हाण, संदीप शिंदे हे उमेदवार रिंगणात होते. ‘नोटा’स नऊ हजार ३९१ इतकी मते मिळाली. ७१ मते अवैध ठरली, १२ लाख १६ हजार १३९ मते वैध ठरली.विजयाची खात्री होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली. उमेदवार संजय देशमुख हे महाविकास आघाडीच्या मतमोजणी केंद्रात पोहचताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय-संजय देशमुख

हा विजय लोकांचा आहे. ही निवडणूक लोकांनीच हाती घेतली होती. हा धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. भविष्यात जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात विजय मिळविण्याचे महाविकास आघाडीचे लक्ष्य राहिल,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close