पुसद:मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक यांनी यवतमाळ सह राज्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या बदलीचे आदेश पारित केले आहे त्यामध्ये पुसद येथील जिल्हा न्यायाधीश -१ व्ही. बी. कुलकर्णी यांचा देखील समावेश आहे. पुसद येथून त्यांची बदली गडचिरोली जिल्हा न्यायाधीश -१ पदी झाली होती परंतु नंतर कुलकर्णी यांच्या नावाचे नवीन बदलीचे आदेश निघाले व आता त्यांची जिल्हा न्यायाधीश -१ यवतमाळ या पदावर नियुक्ती झाली आहे. पुसद येथे जिल्हा न्यायाधीश -१ म्हणून त्यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ आता शेवट ला आला आहे. त्यांना शनिवारी तालुका विधी सेवा समिती, न्यायालयीन कर्मचारी व तालुका विधी सेवेतील वकील संघ पुसद तर्फे निरोप देण्यात आला. न्यायधीश कुलकर्णी यांचा पुसद येथील ३ वर्षांचा कार्यकाळ खूप चांगला गेला व सगळे न्यायालयीन कर्मचारी आणि वकील संघाचे सहकार्य त्यांना लाभले, त्यामुळेच दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यात त्यांना यश मिळाले. गेल्या ३ वर्षात तालुका विधी सेवा समिती चे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात, कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले आहे. तडजोडीसाठी मध्यस्थींचा वापर करावा आणि प्रलंबीत खटले हे समोपचार व समझोत्याने मिटवावे तसेच सामाजिक न्यायामुळे लोकशाही जिवंत असे महत्वपूर्ण संदेश त्यांनी दिले. न्यायधीश कुलकर्णी यांनी पुसद येथे अनेक म्हातवपूर्ण निकाल हि दिले आहे व प्रलंबीत असलेल्या वादावर तोडगा काढलेला आहे त्यामुळे त्यांचा प्रशासकीय व न्यायिक कामकाजाचा आवाका उल्लेखनीय ठरला. उपस्थितांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व न्यायाधीश व्ही बी कुलकर्णी यांना शाल व पुष्पगुच्छ देवून निरोप देण्यात आला. तसेच पुसद न्यायालयातील ३० सुरक्षा जवानांच्या तुकडीनेत्यांचे प्रमुख श्री सोनोने यांच्या नेतृत्वाखाली देखील निरोप समारंभ अयोजीत केला होता. या वेळी सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एन. बी. जाधव, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर जी.एस वरपे, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सौ. एस. जी जाधव , सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कादरी हे कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून उपस्थित होते. अनेक वकील बंधू व भगिनी, न्यायालयीन कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा फोर्स चे सैनिक आदी निरोप कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.