पुसद येथे जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा!

पुसद :औषधी विक्रेता संघ पुसदच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिनाचे आयोजन व्यापारी भवन, दवा बाजार करण्यात आला या कार्यक्रमाला शहरातील सर्व फार्मासिस्ट उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात आरोग्य देवता धन्वतंरी मातेचे पुजन करून करण्यात आली.या कार्यक्रमाला जिल्हा संघटन सचिव सुरज डूब्बेवार, अध्यक्ष रवि पदमवार, सचिव सुशांत महल्ले, कोषाध्यक्ष श्री राहुल डूबबेवार, उपाध्यक्ष संतोष तडकसे , गजानन गादेवार, रणवीर टाले, के. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.प्राऊड टू बी फार्मासिस्ट या विषयावर सुरज डूब्बेवार यांनी अतिषय अनमोल मार्गदर्शन केले समाजात फार्मासिस्ट, केमिस्ट ला आरोग्य दूत म्हणुन ओळख निर्माण झाली पाहिजे या कार्यक्रमा मध्ये पुसद मधील सर्व केमिस्ट बांधवांना ऍप्रॉन चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि पदमवार यांनी केले. सूत्रसंचालन ,व आभार प्रदर्शन सुशांत महल्ले यांनी केले.या कार्यक्रमाला शहरातील सर्व फार्मासिस्ट उपस्थित होते.