राजकिय

पुसद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा कारभार अनागोंदी; नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली तरीही सर्वसामान्य जनतेला स्थानिक पातळीवर पत्रकार परिषद घेऊन माहिती सुद्धा दिली नाही!

निवडणुकीदरम्यान नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असेआवाहन सुद्धा केले नाही.

पुसद : नगर परिषदेची होत असलेली सार्वत्रिक निवडणूक -२०२५ प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. कालपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली आहे परंतु या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी थेट पत्रकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला माहिती पुरवण्याचे प्रकरण दडवले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तरीही अद्याप या दोन्ही अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले नाही. किंवा ही सार्वत्रिक निवडणूक पार पाडण्यासाठी आचारसंहिता नियमाचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सुद्धा केले नाही.पुसद नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासह १५ प्रभागांमध्ये ३१ सदस्यांच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकऱ्यांनी चार-पाच दिवसांपूर्वी नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देऊन बैठकीला बोलाविले होते. परंतु या बैठकीची माहिती सुद्धा मोजक्या राजकीय पक्षांना झाल्यामुळे किंवा या बैठकीचे आयोजन असल्याचे प्रसिद्धी न केल्यामुळे या बैठकीला मोजके राजकीय पक्ष हजर राहिले परंतु सर्वसामान्य नागरिक किंवा जे या निवडणुक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असलेल्या इच्छुक उमेदवारांना याची भनक सुद्धा लागली नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या प्रक्रियेपासून वंचित राहीला. त्यामुळे अशा उमेदवारांना वेळेवर त्यांना लागणारे कागदपत्रे उपलब्ध करण्यासाठी धावपळक करावी लागत आहे. दुसरीकडे निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केली असते तर प्रसारमाध्यमातून या निवडणुक प्रक्रिये बाबत जनतेचे प्रबोधन झाले असते व निवडणुकीचे आचारसंहितेची पालन सुद्धा झाली असतते परंतु निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी याचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आल्याने नामा निर्देश पत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणातील वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात यावरुन कलगीतुरा रंगला आहे.महविकास आघाडीचा ठरला आहे तर महायुतीच्या सहकारी पक्षात “तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना”अशी परिस्थिती आहे.अर्ज भरण्याचा आज दुसरा दिवस आहे. पण नागरिकांना मतदान करण्याचा हक्क संविधानानं दिला आहे आणि लोकशाही मार्गानं आपण मतदान केलं पाहिजे. मतदान करताना आपल्या मनाला जे योग्य वाटेल, त्यांनाच मतदान केलं पाहिजे. कोण सांगतंय त्याला मतदान न करता मतदानाचा निर्णय आपण घेतला पाहिजे. चोर, लफंगे जनतेला लुटणारे या लोकांना जनतेने डावले पाहिजे. ही सर्व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी स्थानिक पातळीवर निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निर्णय अधिकारी यांची जबाबदारी आहे.की, पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, निवडणुक शांतेत व भयमुक्त वातावरण निर्माण होण्यासाठी निवडणूक विभागाची पूर्ण तयारी झाली कां? झाली असेल तर ती कशी त्यासाठी निवडणुक विभाग सज्ज आहेका?, नगर परिषद निवडणुकीसाठी शहरातील एकूण मतदार संख्या किती आहे. यामध्ये पुरुष किती.? स्री मतदार किती.? आहेत.एका मतदारला मतदानाचा हक्क किती वेळा बजवावा लागणार आहे. निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या संकेतस्थळावर संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशन पत्र व शपथपत्र स्वतः उमेदवारांनी नोंदणी करावी, किंवा निवडणूकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कोणीही आचारसंहितेचे उल्लंघन करून नये, शांतेत व भयमुक्त वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन पत्रकार परिषदेचे आयोजन करून करायला हवे होते. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो कारण ह्या निवडणूक प्रक्रियेवर पत्रकार सुद्धा लक्ष ठेवण्याचे काम करते. हे प्रसारमाध्यमांचे एक महत्त्वाचे कार्य आहे, जे लोकांना माहिती पुरवते, जनमत घडवते आणि शासनाला जनतेप्रती जबाबदार धरते. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे या निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती तळागाळातील नागरिकापर्यंत पोहोचविली नाही.परंतु एखादा अपक्ष उमेदवार निवडणूकीत उभा राहणार असेल तर तो या निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल अनभिज्ञ राहणार आहे. पत्रकारांच्या माध्यमातून निवडणुक प्रक्रिया व नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी लागणारे दस्ताऐवज ईच्छुक उमेदवारांना माहिती मिळाली असती तर अधिक सोपे झाले असते. या प्रक्रियेमध्ये पत्रकार बांधव सुद्धा सहभागी झाला असता परंतु ही निवडणूक प्रक्रिया उलट जाणीवपूर्वक दडविल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व मतदार संताप व्यक्त करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close