ब्राह्मण महासंघाच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा!

पुसद : तालुका अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने जागतिक महिला दिना औचित्य साधुन श्री अन्नपूर्णामातचे महाआरती, महाप्रसाद तसेच विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या / केलेल्या महिलांचा सत्कार समारंभ दिनांक ८ मार्च २०२४ रोजी विठ्ठल किंकर मठ पुसद करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲड. सौ. छाया प्रशांतराव देशमुख, सदस्य कृषि उत्पन्न बाजार समिती पुसद हयांनी भूषविले तर सौ. वासंतीताई सुभाषराव सरनाईक (यवतमाळ विभागप्रमुख नैतिक मूल्यशिक्षण वि.हिं.प.), सौ. सुप्रिया उमाकांत पापीनवार (सल्लागार समिती सदस्य, बालाजी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पुसद), सौ.प्रिती विक्रम गट्टाणी (संचालिका, माऊंट लिट्रा झी स्कुल, पुसद), श्रीमती रश्मीताई सुभाष पानपट्टे, श्रीमती वैशालीताई अभिजीत नरसिंग (शिक्षीका), डॉ.प्रणाली इंगोले (त्वचारोग तज्ञ), सौ. भारतीताई रोहित राऊत (शिक्षीका), सौ.आकांक्षा निशांत बयास, (संचालिका, संस्कार पोद्दार लर्न स्कुल, पुसद) हयांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी सर्वप्रथम श्री अन्नपुर्णा मातेची महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वितरीत करण्यात आला. त्यानंतर श्रीमती पुष्पलता देविदास समुद्रे, श्रीमती सुशीला माधवराव पांडे, श्रीमती मालाबाई जोशी, श्रीमती शोभाताई रामचंद्र बनसोडे, श्रीमती चव्हाण काकु, श्रीमती कुमूदताई गांधे, सौ. विजया अविनाश बहादुरे, सौ.लक्ष्मीबाई नारायण फरकांडे, अॅड. अंबिका काळे जाधव, श्रीमती शारदा गजबी, सौ. स्वाती सुबोध पाठे, श्रीमती गोदावरी पापिनवार, सौ. भारती वर्मा, कु. राधा चंद्रशेखर कोडापे, राज्य स्तरावरील सामन्यात सहभागी झालेल्या फुटबॉल तसेच टेबल टेनिस खेळातील जवळपास १५ महिला खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. श्रृती देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. संध्या देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सौ. सविता नंदकुमार जोशी (पारटकर), सौ. अन्नपुर्णा संतोष दिक्षीत, सौ. वंदना विवके सावरकर, सौ. गौरी गजेंद्र पारटकर, सौ. अश्विनी विरेंद्र राजे तसेच ब्राम्हण महासंघाच्या कार्यकत्यांनी मेहनत घेतली.



