खंडाळा पोलिसांच्या आशीर्वादाने सगळे अवैध धंदे तेजीत

पुसद : तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बेकायदेशीर अवैध मटका, जुगार, देशी विदेशी गावठी दारू बेकायदा वाहतूक, वाळूची चोरटी वाहतूक, गांजा व गुटखा यांची बेकायदेशीर विक्री आदी अवैध धंदे तेजीत सुरू असताना पोलिस अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत.सर्व सामान्य नागरिक चिंता व्यक्त करीत असून या अवैध धंद्यांवर कारवाईचा फास आवळण्यात महत्त्वाची भूमिका असलेली पोलीस मात्र वसुलीच्या कामात गर्क आहे.याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्याचे गृहमंत्री व जिल्हा पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी , पुसद यांच्या कडे तक्रार दाखल केली असून संबंधित पोलिस अधिकारी यांच्या वर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.प्राप्त माहिती अशी की, खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेले बेकायदेशीर अवैध मटका, जुगार, देशी विदेशी गावठी दारू बेकायदा वाहतूक, वाळूची चोरटी वाहतूक, गांजा व गुटखा यांची बेकायदेशीर विक्री आदी अवैध धंदे तेजीत सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावे यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे .माळ पठारावरील गावा गावात विद्यार्थी आणि तरुण यांच्यात नशांचे प्रमाण वाढले आहे. काही गावात विशिष्ट ठिकाणी रात्रीच्या वेळी तरुण जमा होऊन नशा करण्याचे प्रकार घडत आहेत.याबाबत खंडाळा पोलीस स्टेशन ला वारंवार कळवूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रश्नाकडे गांभीरपणे लक्ष देऊन गांजाची बेकायदेशीर विक्री थांबवण्यासाठी कठोर कारवाई करावी. तसेच, यामागे काम करणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई करावी. तसेच माळ पठारावर मुळावा येथून राजरोसपणे खंडाळा पोलीस स्टेशन समोरून एका गाडीतून सकाळी नऊ दरम्यान दारूचे बॉक्स ऐवजी त्या गावागावात पोहोचविले जातात आणि वाशिम मार्गे सुद्धा एक गाडी घेऊन अशाच प्रकारचे बॉक्स गावागावात पोहोचवते परंतु याकडे खंडाळा पोलिसांनी पूर्णपणे कानाडोळा केलेला आहे.व्यसनांनी तरुण पिढी ही बरबाद होत आहे. यावर कठोर कारवाई होणे गरजेच असून खंडाळा पोलीस अधिकाऱ्यावर सुद्धा याबाबत कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. खंडाळा पोलीस प्रशासन भानगडी च्या केसेस मध्ये दोन्ही बाजूकडून मॅनेज होताना च्या अनेक तक्रारी गावागावातून येत असून सर्वच गावात अवैध धंद्यांना उधान आलेले असताना स्थानिक पोलीस मात्र वसुलीत गर्ग असल्याने त्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला न जुमानता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हे अवैध धंद्दे रोखण्यासाठी अपयशी असल्याने संबंधित पोलीस निरीक्षक व उपविभागीय अधिकार्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर बडतर्फेची कारवाई करावी याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्याचे गृहमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस अधिक्षक यांच्याकडे तेजित असलेल्या अव तक्रार दाखल केली असून पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सात दिवसाच्या आत अवैध धंदे बंद न केल्यास उपोषण चा इशारा देण्यात आला आहे.



